संजय जाधव यांची ‘दिल दोस्ती दुनियादारी’ चांगलीच गाजली. या मालिकेने तर नाव कमावलेच, सोबत यातील कलाकारांना देखील अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. यातल्या सुज्याचे पात्र प्रेक्षकांना विशेष भावले. स्वभावाने कडक, शिस्तप्रिय, मात्र मित्रांच्या मदतीला धावून जाणारा सुज्या अर्थातच अभिनेता सुव्रत जोशी अजूनही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असणारा अभिनेता आता पुन्हा चर्चेत आला आहे. या चर्चेमागचे कारण, म्हणजे त्याने त्याने नुकतीच शेअर केलेली पोस्ट होय.
लॉकडाऊनमध्ये अनेकांनी गावाची वाट धरली. अभिनेता सुव्रत जोशी देखील त्याच्या गावाकडे निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ घालवत आहे. त्याने कोकणातून त्याचा एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुव्रत शेतामध्ये उभा आहे, तर त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये हिरवंगार शेत देखील दिसत आहे. या फोटोद्वारे त्याने तो शेतात काम करत असल्याचेही चाहत्यांना सांगितले आहे.
शेतातला हा फोटो शेअर करत सुव्रतने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सुपारीला पाणी देऊन काजूंचे बोंडू गोळा करायला निघालेला गडी.” या फोटोवर चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “बोंडू..किती क्यूट शब्दही आणि सुव्रतही!” तर दुसरा युजर म्हणतोय, “किती सुंदर शेत.” तसेच इतर चाहते त्याला कोकणात गाव कोणतं आहे, हा प्रश्नही विचारत आहेत.
सुव्रत हा प्रसिद्ध लेखक शेखर जोशी यांचा मुलगा आहे. त्याने एप्रिल २०२९ मध्ये त्याची सहकलाकार सखी गोखलेसोबत लग्नगाठ बांधली. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर त्याने ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दिल दोस्ती दोबारा’ आणि ‘आठशे खिडक्या आणि नऊशे दारे’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस
-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज
-नादच खुळा! यूट्यूबर शिरुश्रीने केला धमाकेदार ‘शिव तांडव’ डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय