Saturday, June 27, 2026
Home बॉलीवूड अक्षय कुमार अभिनित ‘हैवान’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

अक्षय कुमार अभिनित ‘हैवान’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

अक्षय कुमार हा बॉलीवूड मधील एक लोकप्रिय कलाकार आहेत कारण त्याचे आतापर्यंतचे चित्रपट हे नेहमीच ब्लॉकबस्टर राहिले आहेत आणि तू त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांना हसण्याचे काम करत असतो. जसे की हेराफेरी गरम मसाला वेलकम भूत बंगला या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांना प्रचंड हसवले आहे आणि सध्या त्याचा रिलीज झालेला चित्रपट म्हणजे वेलकम टू द जंगल हा चित्रपट आता बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे तर आता अश्यातच अक्षयचा आता अजुन एक चित्रपट येणार आहे. तर हा चित्रपट म्हणजे हैवान. या चित्रपटात  सैफ अली खान देखील असणार आहे. तर याची आता प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे.

‘हैवान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे. म्हणजे अक्षय आणि प्रियदर्शन हि जोडी नेहमीच एक उत्तम चित्रपट घेउन येते. तर या चित्रपटासाठी प्रेक्षक आता आतुर आहेत. तर ही चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे प्रॉडक्शन्सनी सांगितले आहे.  नुकतेच, केव्हीएन प्रॉडक्शन्सने ‘हैवान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

या चित्रपटात सैफ अली खान आणि अक्षय कुमार (kumar)मुख्य भूमिकेत आहेत. तर अक्षय आणि प्रियदर्शन हि जोडी या वर्षाच्या सुरुवातीला तो प्रियदर्शनच्या ‘भूत बंगला’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट ही उत्तम गाजला तर सैफ अली खान नुकतच नेटफ्लिक्स वरील त्याच्या ‘कर्तव्य’ या क्राईम-थ्रिलरमुळे चर्चेत राहीला होता मात्र मोठ्या पडद्यावर सैफला पाहण्यासाठी आता चाहते आतुर आहेत.

हेही वाचा

दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या 73 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले निधन

हे देखील वाचा