Saturday, June 27, 2026
Home बॉलीवूड ‘वेलकम टू द जंगल’ने पहिल्याच दिवशी उत्तम कामगिरी करत कमाईचे मोडले मोठे विक्रम

‘वेलकम टू द जंगल’ने पहिल्याच दिवशी उत्तम कामगिरी करत कमाईचे मोडले मोठे विक्रम

अक्षय कुमार (kumar)हा बॉलीवूड मधील एक लोकप्रिय कलाकार आहेत कारण त्याचे आतापर्यंतचे चित्रपट हे नेहमीच ब्लॉकबस्टर राहिले आहेत आणि तो त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांना हसण्याचे काम करत असतो. जसे की हेराफेरी, गरम मसाला, वेलकम, भूत बंगला या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांना प्रचंड हसवले आहे आणि सध्या त्याचा रिलीज झालेला चित्रपट म्हणजे वेलकम टू द जंगल हा चित्रपट आता बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे तसेच या चित्रपटाची टीम सुद्धा खूप मोठी आहे. तर या चित्रपटात एकूण 34 दिग्गज कलाकारांनी काम केले आहे. 

वेलकम टू द जंगल हा चित्रपट 25 जून 2026 रोजी पेड प्रिव्ह्यू आयोजित करण्यात आले होते. चित्रपटाने उत्कृष्ट कामगिरी करत बॉक्स ऑफिसवर एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. ‘वेलकम टू द जंगल’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. बॉक्स ऑफिस ट्रॅकर वेबसाइट सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने भारतातील पेड प्रिव्ह्यूमधून 3.75 कोटींची  प्रभावी निव्वळ कमाई नोंदवली आहे. पेड प्रिव्ह्यूमधील आपल्या प्रभावी कामगिरीमुळे, ‘वेलकम टू द जंगल’ हा आता भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

‘वेलकम टू द जंगल’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर उत्तम स्थान निर्माण केले आहे. चित्रपटाने आतापर्यंत 7.33 कोटींची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाची भारतातील एकूण कमाई 18.9 कोटी झाली आहे आणि निव्वळ कमाई 15.27 कोटी झाली आहे. ही आकडेवारी रात्री 9 वाजेपर्यंतची आहे. कृपया लक्षात घ्या की हे अंतिम आकडे नाहीत; पहिल्या दिवसाची अंतिम आणि अचूक कमाई शनिवारी सकाळी 10 वाजता अपडेट केली जाईल.

हेही वाचा

‘त्याच्यात काहीही बदललेलं नाही’; २२ वर्षांनंतर ‘वेलकम टू द जंगल’मध्ये अक्षय कुमारसोबत रवीना टंडनने काम करण्याबाबत केले वक्तव्य

हे देखील वाचा