Friday, May 24, 2024

विजय देवरकोंडा करतोय नॅशनल क्रशला डेट? सहकलाकाराचा खुलासा

अभिनेत्री अनन्या पांडे (ananya pandey)आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (vijay devarkonda) यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या (karan johar) ‘कॉफी विथ करण सीजन ७’ च्या चौथ्या भागात, धमाकेदार एंट्री केली.करण जोहरच्या शोमध्ये दोघांनी केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्या विषयीच चर्चा केली नाही तर, एकमेकांशी संबंधित अनेक गुपितंही उघड केली. या भागात विजय देवरकोंडा याने स्वतःच्या आणि रश्मिका मंदान्ना (rashmika manddana)हिच्या नात्यावर मौन सोडले आहे, तसेच अभिनेत्रीला जाहीरपणे ‘डार्लिंग’ असे म्हटले आहे. या संदर्भात बोलताना अभिनेत्याने सांगितले की,”ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि आम्ही आयुष्यातले चढ-उतार एकत्र पाहिले आहेत. “

रश्मिका आहे विजयची डार्लिंग
रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सोबतच्या त्याच्या बॉण्डबद्दल बोलत असताना विजय (vijay Deverakonda) तिला ‘डार्लिंग’ असे म्हणतो. तो म्हणाला की, “आम्ही दोन चित्रपट एकत्र केले आहेत. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि सिनेमांमध्ये काम करताना आम्ही एकमेकांच्या आयुष्यातील अनेक चढउतार पाहिले आहेत. आमच्यात एक चांगला बॉण्ड तयार झाला आहे. चित्रपटांमध्ये तुम्ही एकमेकांसोबत काम करत असता, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होते.”

काय आहे विजयचं रिलेशनशिप स्टेटस?
विजयने या भागामध्ये त्याचं रिलेशनशिप स्टेटस देखील उघड केलं आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “माझ्या आई-वडिलांसोबत माझे खूप चांगले संबंध आहेत. ज्या दिवशी माझे लग्न होईल आणि मला मुले होतील, त्या दिवशी मी स्वतः सर्वांना सांगेन. अनेक लोक आहेत जे माझ्यावर प्रेम करतात. माझे पोस्टर त्यांच्या भिंतींवर आणि फोनवर लावतात. ते माझ्यावर प्रेम करतात आणि मला त्यांचे हृदय असे तोडायचे नाही.”

अनन्या पांडेनेही केली नात्याची पुष्टी
विजय देवरकोंडासोबत अनन्या पांडेनेही (Ananya Pandey) त्याच्या आणि रश्मिका मंदान्ना यांच्यातील नात्याची पुष्टी केली आहे. दोघांच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ते लवकरच ‘लायगर’ (Liger) या चित्रपटात दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिनेत्रीची पोलिसात धाव, पाहा काय आहे प्रकरण
नसीरुद्दीन शाह यांचे वादांशी आहे जुने नाते, पत्नीच्या विवादात्मक वक्तव्याने पुन्हा उडाली खळबळअरेरे कसलं ते दुर्देव! ‘या’ सुपरहिट सिनेमांना लाथाडत संजू बाबाने केली मोठी चूक? ‘बाहुबली’चाही समावेश

हे देखील वाचा