चित्रपट निर्माता अनुराग कश्यपची (Anurag Kashyap) मुलगी आलिया कश्यपने (Aaliyah Kashyap) नुकताच तिचा २१ वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान, सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ आलियाने युट्यूबवर शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने सांगितले आहे की, यावर्षी तिने तिच्या वाढदिवशी दारूचा पहिला घोट घेतला. कारण तिच्या वयात असे करणे कायदेशीर आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आलियाने सर्वांचे आभार मानले आहेत. हा व्हिडिओ बनवताना तिला थोडे विचित्र वाटत असल्याचेही सांगितले.
व्हिडिओ होतोय व्हायरल
बाथरूममध्ये आरशासमोर उभी राहून आलियाने सुरुवातीचा व्हिडिओ बनवला आहे. आलिया म्हणताना दिसली, “तुम्हा सर्वांना माझ्याबद्दल कदाचित एक गोष्ट माहित नसेल, ती म्हणजे मी माझ्या वाढदिवसाबद्दल खूप उत्सुक आहे. मला माझा वाढदिवस खूप आवडतो. हा एक असा दिवस आहे जो फक्त माझ्याबद्दल असतो. ज्या लोकांना त्यांचा वाढदिवस आवडत नाही. माझ्यासाठी ते लोक विचित्र आहेत. दरवर्षी मी खूप उत्साही असते. कदाचित सहा महिने आधीच मी माझ्या वाढदिवसाविषयी उत्साही होऊ लागले.”
पुढे ती म्हणाली, “जे लोक भारतातील आहेत त्यांना माहित आहे की, कोव्हिड-१९ मुळे येथील परिस्थिती चांगली नाही. आपण तिसऱ्या लाटेत आहोत आणि वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. मी १६ वर्षांची होते तेव्हापासून २१ वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहत होते. यावेळी माझ्या वाढदिवशी मी पाच जणांना जेवणासाठी आमंत्रित केले आहे. नाहीतर मी ३०-३५ जणांना फोन करणार होते. माझ्या घरी येण्यापूर्वी या पाच जणांची कोव्हिड-१९ चाचणी होईल याची मी खात्री केली आहे. मला कोणाचाही जीव धोक्यात घालायचा नाही.”
“मी माझ्या आईच्या घरी जात आहे. तिथे मी, शेन माझा बॉयफ्रेंड, इडा (इम्तियाज अलीची मुलगी), आई आणि इडाचे आई-वडील असू. मी २१ वर्षांची होईल. मी शेवटी ड्रिंक घेऊ शकते आणि लोकांचे टोमणे ऐकणार नाही. आता मी नशेचे व्हिडिओ बनवू शकते, ज्यासाठी मी थांबू शकत नाही.” असेही आलिया म्हणाली आहे.
आलियाची आई आरती बजाज यांनी घर फुग्याने सजवले होते. यादरम्यान शेनने आलियाला पॅरिस ट्रिप सरप्राईज गिफ्ट दिले.