Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड Chander Bahl Passed Away | दुःखद ! दीपिका चिखलियाला हिरोईन बनवणाऱ्या दिग्दर्शकाचे निधन

Chander Bahl Passed Away | दुःखद ! दीपिका चिखलियाला हिरोईन बनवणाऱ्या दिग्दर्शकाचे निधन

Chander Bahl Passed Away | प्रसिद्ध दिग्दर्शक चंदर हंसराज बहल यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक हिंदी आणि गुजराती मालिका दिग्दर्शित केल्या. ते प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हंसराज बहल यांचे पुत्र होते. ‘जननी’ आणि ‘पिया का घर’ या त्यांच्या प्रसिद्ध मालिका आहेत. त्यांनी 1983 मध्ये ‘सुन मेरी लैला’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

अभिनेत्री दीपिका चिखलियाला हिरोईन बनवण्याचे श्रेय चंदर हंसराज यांना जाते. चंदर हंसराज यांनी ‘रामायण’ सीरियल फेम अभिनेत्री दीपिका चिखलियाचा पहिला चित्रपट ‘सुन मेरी लैला’ दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट 1983 मध्ये आला होता. यात दीपिकाशिवाय राज किरण, टीपी जैन, बिरबल आणि मधु मल्होत्रासारखे स्टार्सही दिसले होते.

हिंदी आणि पंजाबी चित्रपटांचे प्रसिद्ध संगीतकार हंसराज बहल यांचा मुलगा चंदर हंसराज याने दिग्दर्शनाच्या जगात आपले नाव कमावले. त्यांनी अनेक लोकप्रिय मालिका दिग्दर्शित केल्या. याशिवाय त्यांनी गुजराती भाषेतील शोचे दिग्दर्शनही केले.

चंदर हंसराज बहल यांनी ‘हुकूमत जट्ट दी’ आणि ‘दर्द ए दिल’ देखील दिग्दर्शित केले होते. चंद्र हंसराज बहल यांनी टीव्ही मालिकांव्यतिरिक्त चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी मिथुन चक्रवर्ती अभिनीत सन सजना (1982) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अभिनयात करिअर करणाऱ्यांसाठी खुशखबर!, यशराज फिल्म्सने लाँच केले कास्टिंग ॲप
साऊथ चित्रपटात एका मिनिटाच्या सीनसाठी 4 करोड फी घेतो ‘हा’ बॉलिवूड अभिनेता

हे देखील वाचा