Friday, May 24, 2024

अर्चना गौतमला डिवचण्यासाठी शिव ठाकरेनं खेळला मोठा खेळ?

छाेड्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘मध्ये स्पर्धकांमध्ये चांगलाच गोंधळ सुरू आहे. गुरुवार (दि. 10 नाेव्हेंबर)ला झालेल्या एपिसोडमध्ये दोन स्पर्धकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यातील भांडणाने सर्व मर्यादा ओलांडल्या. टिश्यू पेपरवरून दोघांमधील भांडण सुरू झाले आणि पुढे हाणामारी हाेता हाेता राहिली. अर्चनाने शिव ठाकरेंचा गळा पकडला, त्यानंतर शिवचा रागही उसळला. या संपूर्ण गोंधळानंतर अर्चनाला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याचवेळी, आता ‘फ्रायडे का वार’मध्ये हा मुद्दा उपस्थित होणार असून त्याचा प्रोमो समोर आला आहे.

‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर शोचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान खान (Salman Khan) याचा संतप्त चेहरा पाहायला मिळत आहे. यासोबतच शिव ठाकरे (Shiv Thakare ) याची संपूर्ण योजनाही सांगण्यात आली आहे. शिव ठाकरे अर्चना ( Archana Gautam) हिला भडकवण्याबाबत बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अर्चनाला कसे चिडवायचे हे त्याला माहित असल्याचे तो म्हणतो. शिव अर्चनाच्या पक्ष, निवडणूक, दीदी याबद्दल बोललो तर ती चिडते. यानंतर, अर्चना आणि शिवच्या भांडणाची एक क्लिप व्हिडिओमध्ये जोडली गेली आहे, ज्यामध्ये शिवने आधी उल्लेख केलेल्या शब्दांचा वापर केला आहे. या प्रोमोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “शुक्रवार का वारमध्ये सत्य येईल समोर, यावेळी सलमान घेणार शिवाचा क्लास?”

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

‘बिग बॉस 16’ चा आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये टीना दत्ता आणि प्रियंका चहर चौधरी स्वयंपाकघरातील कामासाठी भांडताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही हा प्रोमो चांगलाच व्हायरल होत असून आगामी एपिसाेडमध्ये नेमके काेणाला घरातून बाहेर काढणार हे बघायसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. (bigg boss 16 shukrawar ka vaar shiv thakare and archana gautam ugly fight salman khan exposed the reality)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकट्या सिद्धांत सुर्यवंशीने नाही, तर ‘या’ कलाकारांनीही वर्कआउट करताना गमावले प्राण
‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटाने साजरा केला मुलगा जय आणि मुलगी जियाचा पहिला वाढदिवस, पाहा फाेटाे

हे देखील वाचा