×

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पांघरुण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, ‘एका विलक्षण प्रेमाचा’ होणार उलगडा

मराठी चित्रपटसृष्टीत ‘नटसम्राट’, ‘काकस्पर्श’, यांसारख्या उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहेत. या चित्रपटानंतर आता महेश मांजरेकर नव्याने चित्रपट घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. नुकताच त्यांच्या ‘पांघरुण’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरत आहे.

महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांचा ‘पांघरुण’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. ज्याला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळाली. चित्रपटांतील गाण्यांना देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नुकताच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे हा चित्रपट आता पुन्हा नव्याने चर्चेत आला आहे.

ट्रेलरचा व्हिडिओ सुरू झाल्यानंतर स्वातंत्र्य पूर्वीचा काळ आणि निसर्गरम्य असलेले कोकण दिसते. नंतर वयाच्या १४ व्या वर्षी विधवा झालेल्या मुलीचा विवाह एका तिच्यापेक्षा दुप्पट -तिप्पट वयाने जास्त असलेल्या कीर्तनकाराशी होतो. या कीर्तनकाराला दोन मुली असतात. तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या साथीदारासोबत राहताना प्रेमासाठी तिची प्रचंड घालमेल होताना दिसत आहे. या ट्रेलरमधून त्यांच्या प्रेमाचा ‘एका विलक्षण प्रेम कहाणी’चा उलगडा होताना दिसत आहे. हा ट्रेलर २ मिनिटे ५६ सेकंदाचा आहे.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘पांघरूण’ चित्रपटाबद्दल म्हणाले की “बराच काळ आम्ही चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होतो. अखेर ४ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना ‘पांघरूण’ पाहता येणार असल्याने मी सुद्धा खूपच उत्सुक आहे. चित्रपटातील गाण्यांचे रसिक प्रेक्षकांकडून जे कौतुक होत आहे, याचा खूप आनंद आहे. प्रत्येक कलाकाराने आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. ‘पांघरूण’चे संगीत सुद्धा उत्तम झाले आहे. आता हळूहळू अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित होऊ लागले आहेत आणि मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत आहेत, त्यांच्या या प्रेमामुळेच आम्हाला प्रोत्साहन मिळते. प्रेक्षकांनी आजवर ज्याप्रमाणे माझ्या इतर चित्रपटांवर प्रेम केले तसेच प्रेम ‘पांघरूण’वरही करतील, याची खात्री आहे.”

महेश मांजरेकर व झी स्टुडिओज ‘पांघरूण’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा अनोखा कलाविष्कार रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यास सज्ज झाले आहेत.

हेही वाचा :

 

Latest Post