×

‘मॅडम पँट घरीच विसरल्या वाटतं!’, रश्मिका मंदान्नाचा एअरपोर्ट लूक पाहून नेटकऱ्यांनी साधला निशाणा

रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) ही साऊथ सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकतीच रश्मिका मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये रश्मिकाला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केले जात आहे. युजर्स म्हणत आहेत की, तिला थंडी वाजते की नाही. त्याच वेळी, बरेचजण तिला ओळखूही शकले नाहीत.

‘अशा’ लूकमध्ये दिसली अभिनेत्री
व्हिडिओमध्ये रश्मिका मंदान्ना विमानतळावर दिसत आहे. तिने हुडीसह शॉर्ट्स घातली आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. यावर तिने टोपी घातली आहे आणि चेहऱ्यावर मास्क लावले आहे. काही युजर्सने रश्मिकाच्या लूकची जोरदार प्रशंसा केली, तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. (rashmika mandanna gets brutally trolled for her airport look)

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

नेटकऱ्यांनी केलं जोरदार ट्रोल
व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “तिला थंडी लागत नाही, मी संध्याकाळी स्वेटर घालून घराबाहेर पडलो तरी थरथर कापतो!” दुसर्‍याने कमेंट केली, “मॅम घाईत पॅंट घालायला विसरल्यासारखे दिसते.” दुसर्‍याने लिहिले, “मला वाटले की ती फुटबॉल खेळाडू आहे.” तिथे एकजण म्हणाला, “एवढ्या थंडीतही शॉर्ट्स?”

येणार ‘पुष्पा’चा सिक्वेल
विशेष म्हणजे रश्मिका मंदान्ना सध्या ‘पुष्मा : द राइज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने अल्लू अर्जुनसोबत काम केले होते. रश्मिकाने या चित्रपटात श्रीवल्ली ही व्यक्तिरेखा साकारली, जी चांगलीच पसंतीस उतरली. या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नाही तर उत्तर भारतातही चांगली कमाई केली आहे. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे.

येतायत बॉलिवूडमधून ऑफर
‘पुष्पा: द राइज’नंतर रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता पाहून बॉलिवूडच्या अनेक निर्मात्यांनी तिला चित्रपटाच्या ऑफर दिल्या आहेत. शंतनू बागची दिग्दर्शित ‘मिशन मजनू’ या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. त्याचवेळी, रश्मिका ‘गुडबाय’चा देखील एक भाग आहे. ज्यामध्ये ती अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

हेही वाचा :

Latest Post