Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘चौथीत असतानाच दारु प्यायचो…’, नागराज मंजुळेंच्या आयुष्यामुधील हैराण करणारा प्रसंग, एकदा वाचाच

मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे हे पुन्हा एकदा ‘घर बंदुक बिर्यानी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांनी सैराट, फॅंड्री, झुंड, नाळ, सारखे गाजणारे चित्रपट देऊन इंडस्ट्रीमध्ये नावलौकीक मिळवलं. मंजुळेंच्या करिअरबद्दल तर सगळ्यांनाच माहित आहे. सध्या दिग्दर्शक त्यांच्या नवीन चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहेत अशताच त्यांच्या चित्रपटाशी निगडीत असणारा एक प्रशन त्यांना विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी दारु आणि सिगारेट बद्दल त्यांच मत मांडत त्यांच्या आयुष्यामधील एक रंजक किस्साही सांगितला.

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) चौथीमध्ये शिकत असतानाच त्यांना दरुचं व्यसन लागलं होतं. त्यांचे वडील दारु प्यायचे त्यामुळे त्यांना देखिल दारुची लालसा लागली. त्यांच्या घरामध्ये दारुच्या बाटल्या आसायच्या याच बाटलीतली दारु ते पाणी न टाकताच प्यायचे आणि वडीलांना कळू नये म्हणून त्यामध्ये हाप्स्याचं पाणी भरुन ठेवायचे. पण सातवीमध्ये असताणा त्यांचं दारुच व्यसन कसं सुटलं हे त्यांनी दिलेल्या मुलाखीतमध्ये सांगितलं आहे.

नागराज मंजुळे म्हणाले की, “माझं धरणं आणि सोडणं याबद्दल अजिबात विश्वास नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की ते व्यसन असतंच. ते वाईट असतं आणि हानिकारकही असतं, याची सर्वांनाच कल्पना आहे. आपण एखाद्याची आपण सेवा करतो म्हणजे उदा. जर आपण एखाद्याचे पाय दाबून देत असू तर काही काळासाठी ते चांगलं वाटतं, पण मग सतत पाय दाबत राहिलं तर तो माणूस मरून जाईल. जास्त खायला घातलं तर तो माणूसही जिवंत राहणार नाही”

 

View this post on Instagram

 

“व्यसन म्हटलं तर दारु आठवते हे मला जरा खटकतं. कोणाला कशाचं व्यसन आहे काहीही सांगू शकत नाही. मला तर अनेक गोष्टींचं व्यसन आहे. दारु वाईट नाही पण त्याचा अतिरेक केला की ते घातक ठरतं. अनेक जण सिगारेट ओढतात हे एक व्यसनच आहे, पण त्याची ओढण्याची स्टाईल भारी असल्यामुळे लोकांना खूप भारी वाटतं. तंबाखूचं व्यसन अनेकांना आहे, पण ते दिसायला बरं नाही दिसत त्यामुळे ही गोष्ट लपून केली जाते. पण सिगारेट ओढणं म्हणजे ती व्यक्ती मोठी आहे असे मानले जाते. माझ्या ओळखीतील काही माणसं आहेत, त्यांना ओळखीतले लोक दिसली तरच ती लोक सिगारेट दाखवून ओढतात. पण तेच जेव्हा एकटे असतात तेव्हा त्यांना सिगारेटची कधीच आठवण येत नाही.

पण जोपर्यंत लोकं समोर आहेत तोपर्यंत सिगरेट पेटवायची आणि लोकं गेली की लगेच विझवायची. याचा अर्थ तुम्हाला तुमची एक इमेज तयार करायची असते. माणूस अति दारू पिऊन मरतो असं म्हणतात. पण तसं मुळीच नसतं. त्याच्याबरोबर असलेलं दुःख पिऊन तो मरत असतो. आपण दारू सोडा म्हणून सांगतो पण त्याच्या समस्या सोडवायचा कोणी प्रयत्न करत नाही. त्यामुळे ही गोष्ट खुप गुंतागुंतीची आहे. यात मला काळं पांढरं करु वाटत नाही. माझी ती इच्छा नाही. चित्रपटात जसं कोणाला तरी नकारात्मक भूमिकेसाठी बनवावं लागतं, मग त्यात दारूला केलं जातं. पण माणसं वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिलन असतात. दारू, सिगारेट वाईट नाही. पण त्याचं व्यसन खूप वाईट आहे.”

काही दिवसांपूर्वीच नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘घर बंदुक बिर्यानी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यामध्ये नागाराज मंजुळे स्वत: आणि परशा म्हणुन प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता आकाश ठोसर आणि प्रसिद्ध खलनायक म्हणजेच सयाजी शिंदे सारखे दमदार कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ‘घर बंदुक बिर्यांनी’ या चित्रपटाची कथा पोलिस आणि गुन्हेगारांच्या भोवती फिरणारी दाखवली आहे. येत्या मार्च महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आई माझ्यासाठी सर्वस्व होती..’, किरण माने यांना आईच्या निधनानंतर केला होता राखी सावंतने फोन
रमेश देव यांना ‘देव’ हे आडनावच राजश्री शाहू महाराजांनी दिलं होतं, पाहा काय आहे यामागची स्टोरी

हे देखील वाचा