Tuesday, July 9, 2024

कॅटरिना कैफने केला ‘या’ दिग्दर्शकाचा चित्रपट साईन; अमिताभ बच्चनही साकारणार महत्त्वाची भूमिका?

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ तिच्या सौंदर्याच्या जोरावर अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करते. ‘बूम’ चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात करणारी कॅटरिना कैफ आज बॉलिवूडमधील एक मोठ्ठं नाव आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत तिने अपार कष्ट घेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अलीकडेच कॅटरिनाच्या नवीन चित्रपटाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, कॅटरिनाने दिग्दर्शक आर. बाल्की यांच्यासोबत सिनेमा साईन केला असून काम करण्यास सुरुवातही केली आहे.

कॅटरिना आर. बाल्की यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा एक महिलेला केंद्रित करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर तिचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चनही दिसणार आहेत.

अमिताभ यांनी आर. बाल्कीसोबत यापूर्वी ३ चित्रपट केले आहेत. या चित्रपटात सनी देओल, दलकीर सलमान आणि पूजा भट्ट देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कॅटरिनासोबत अमिताभ यांचा हा चौथा चित्रपट असेल. या आधी दोघेही ‘बूम’, ‘सरकार’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात दिसले आहेत. अमिताभ आणि कॅटरिनाचे चाहते नक्कीच या चित्रपटाची वाट पाहत असतील.

अक्षय कुमारसोबत कॅटरिनाचा आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होणार आहे. जो गेल्या एक वर्षापासून रखडला गेला होता. याशिवाय कॅटरिना सलमानसोबत ‘टायगर ३’ ‘फोन भूत’ आणि ‘जी ले जरा’ या चित्रपटातही काम करत आहे.

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांचे ‘चेहरे’ आणि ‘झुंड’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. याशिवाय ते ‘ब्रह्मास्त्र’, ‘गुडबाय’, ‘मेडे’ आणि ‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेक सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शर्मिला टागोरांनी बिकिनी घातल्यामुळे झाला होता मोठा वाद; फोटो पाहून टायगर पतौडींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

-प्रतिभावान अभिनेता असूनही रणवीर शोरीच्या वाट्याला आल्या कायम सहाय्यक भूमिका, पण वैयक्तिक आयुष्यामुळे मिळाली जास्त प्रसिद्धी

-सैफ अली खानने भाड्याने दिले त्याचे फॉर्च्युन हाइट्समधील घर; ‘इतके’ पैसे मिळूनही दरवर्षी वाढत जाणार रेंट

हे देखील वाचा