Tuesday, July 9, 2024

‘तुमच्या आयुष्यात खिलाडी होऊ नका’, स्टंटचे सिनेमे करणारा रोहित शेट्टीच का सांगतोय असं?

सर्वत्र कोरोनाचे लसीकरण होताना दिसत आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील ही लस घेतली आहे.याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे. नुकतेच बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याने लस घेतली आहे. इंस्टाग्रामवर लस घेतानाच एक फोटो शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे.

हा फोटो शेअर करून असे लिहिले आहे की, “ऍक्शन आणि स्टंट चित्रपटासाठी आहे. तुमच्या आयुष्यात असे खतरों के खिलाडी होण्याचा प्रयत्न करू नका. जाऊन लस घेऊन या. कोरोनाशी लढायचे हे एकच शस्त्र आहे. आज मी ही लस घेतली आहे. नानावटी हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार.”

रोहित सोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या लसीचा डोस घेतला आहे. यामध्ये सलमान खान, संजय दत्त, हेमा मालिनी, अनुपम खेर, जॉनी लिव्हर, सैफ अली खान, कमल हसन या कलाकारांचा समावेश आहे.

रोहित शेट्टी लवकरच ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट घेऊन येणार आहे. हा चित्रपट 23 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार ,कॅटरिना कैफ, रणवीर सिंग हे महत्वाची भूमिका निभावताना दिसत आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळत असते. या आधी देखील त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

रोहित शेट्टी हा बॉलिवूडमधील एक दमदार दिग्दर्शक आहे. त्याच्या चित्रपटात ऍक्शन जास्त दाखवली जाते. सुर्यवंशी या चित्रपटात देखील अनेक ऍक्शन सीन आहेत. यातील बरेच ऍक्शन सीन अक्षय कुमारने केले आहे. तसेच रोहितने अनेक रियॅलिटी शोमध्ये देखील जज म्हणून काम पाहिले आहे. त्याचा खतरों के खिलाडी हा एक हिट शो आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खेसारी लालचं नवीन गाणं रिलीझ, पंजाबी गायकांनाही देतोय टक्कर; चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद

-सुपरस्टार अरविंद आणि काजल पहिल्यांदाच दिसले रोमान्स करताना, व्हिडिओ पाहून प्रेक्षक भलतेच खुश

-मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

हे देखील वाचा