Tuesday, February 18, 2025
Home भोजपूरी सुपरस्टार अरविंद आणि काजल पहिल्यांदाच दिसले रोमान्स करताना, व्हिडिओ पाहून प्रेक्षक भलतेच खुश

सुपरस्टार अरविंद आणि काजल पहिल्यांदाच दिसले रोमान्स करताना, व्हिडिओ पाहून प्रेक्षक भलतेच खुश

जर बॉलिवूडमधील सलमान खान आणि दीपिका पदुकोण या दोघांनी जर पहिल्यांदा एकत्र चित्रपटात रोमान्स केला तर कसे दिसतील ते? या दोघांनी जर एकत्र काम केले, तर तो चित्रपट ब्लॉकबस्टर होईलच सोबत त्यांचे चाहते देखील खूप खुश होतील. तसेच बॉक्स ऑफिसवर तर त्यांचा हा चित्रपट एक वेगळीच उंची गाठेल. असंच काहीसं भोजपुरी चित्रपटसृष्टीत पाहायला मिळत आहे. भोजपुरी सुपरस्टार गायक अरविंद अकेला कल्लू आणि भोजपुरी क्वीन काजल राघवानी पहिल्यांदाच एकत्र एका व्हिडिओ साँगमध्ये दिसले आहेत.

हे दोन दिग्गज कलाकार एकत्र आल्यावर धमाका तर होणारच होता. आणि असंच काही दृश्य आता पाहायला मिळत आहे. वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्तुत भोजपुरी अल्बमच्या इतिहासात पहिल्यांदाच अरविंद कल्लू आणि काजल राघवानी एकत्र काम करणार आहेत. वर्ल्ड वाईल्ड रेकॉर्ड भोजपुरीच्या अधिकृत चॅनेलवर कल्लूचे ‘कल्लू को पल्लू से बांधोगी कहिया’ हे भोजपुरी गाणे रिलीझ झाले आहे. हे गाणे अरविंद कल्लू आणि शिल्पी राज यांनी गायले आहे.

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील या दोन सुपरस्टारला एकत्र बघून सगळ्या प्रेक्षकांना खूपच आनंद झाला आहे. हे सुपरहिट गाणे 1 एप्रिलला सकाळी 6 वाजता रिलीझ केले आहे. केवळ एकाच दिवसात या गाण्याला 25 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अरविंद कल्लू हे एक गाजलेले नाव आहे. आणि त्याच्यासोबत सुंदर अभिनेत्री काजल राघवानी हिने काम केले आहे.

हे गाणे त्यांनी खूप भव्य पद्धतीने शूट केले आहे. या व्हिडिओला चित्रपटातील गाण्यासारखे शूट केले आहे. काजल आणि अरविंद कल्लूचे चाहते या गाण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. ‘आशुतोष तिवारी’ यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तसेच साजन मिश्रा यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. रवी पंडित हे व्हिडिओ दिग्दर्शक आहेत. तसेच कोरिओग्रॉफर राहुल यादव हे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तमन्ना भाटियाने वेगळ्याच अंदाजात केला ‘डोन्ट रश चॅलेंज’ गाण्यावर डान्स, व्हिडिओला ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-‘लग्नानंतर काम करणार नाही’, शूटिंगवर परल्यानंतर अनुष्काचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

-खेसारी लालचं नवीन गाणं रिलीझ, पंजाबी गायकांनाही देतोय टक्कर; चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद

हे देखील वाचा