दिनांक 8 ऑगस्ट, 2022 हा दिवस शाहरुख खान याच्या चाहत्यांच्या स्मरणात राहणारा आहे. याच दिवशी शाहरुखचा ‘परदेस’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला या महिन्याच्या सुरुवातीला 25 वर्षे पूर्ण झाली. 10 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या शाहरुखच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 4 पट म्हणजेच 40 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. इतक्या वर्षांनंतरही हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात अजूनही तसाच्या तसाच आहे. नुकतेच या सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष घई यांनी सिल्व्हर जुबली साजरी केली. चला तर जाणून घेऊया सिनेमाबद्दल रंजक माहिती…
माधुरीला पहिल्यांदा ऑफर केलेला ‘गंगा’चा रोल
‘परदेस’ या सिनेमाची मुख्य अभिनेत्रीचा म्हणजेच ‘गंगा’चा रोल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिला ऑफर करण्यात आला होता. मात्र, ‘खलनायक’ या सिनेमावेळी माधुरी आणि सुभाष घई (Subhash Ghai) यांच्यात काहीतरी बिनसलं. त्यामुळे या सिनेमात माधुरीच्या जागी महिमा चौधरी (Mahima Chaudhry) हिला घेण्यात आले. विशेष म्हणजे, ‘परदेस’ सिनेमापूर्वी सुभाष यांना शाहरुख खान (Shahrukh Khan) हा बिल्कुल आवडत नव्हता.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सुभाष घई हे ‘परदेस’ या सिनेमापूर्वी शाहरुखला पसंत करत नव्हते. सन 1991मध्ये त्यांनी एकदा शाहरुखशी हातमिळवणी करत म्हटले होते की, ‘हा मुलगी प्रसिद्ध झाला, तर त्याच्या यशाने आणि वाईट वर्तणुकीमुळे सर्वांना बर्बाद करून टाकेल.’ मात्र, ‘कभी हाँ, कभी ना’ या सिनेमावेळी सुभाष यांनी जेव्हा शाहरुखला गौरी आणि तिच्या कुटुंबीयांची काळजी घेताना पाहिले, तेव्हा त्यांनी शाहरुखला त्यांच्या सिनेमात घेण्याचा विचार केला.
परदेस सिनेमातून महिमा चौधरी हिने बॉलिवूड पदार्पण केले होते. या सिनेमात कास्ट करण्यापूर्वी सुभाष यांनी महिमाचे नाव ऋतु बदलून महिमा ठेवले. कारण, सुभाष यांचा असा विश्वास होता की, ‘M’ हे नाव त्यांच्यासाठी लकी आहे. सिनेमातील आपल्या पात्रामुळे शाहरुख खूपच नाराज होता. शाहरुखला वाटत होते की, सिनेमात त्याच्या तुलनेत महिमाला जास्त स्क्रीन स्पेस दिला गेला आहे. त्यानंतर शाहरुखने सुभाष यांच्यासोबत पुन्हा कधीच काम न करण्याचा विचार केला.
सिनेमात शाहरुखला कास्ट केल्यानंतर निर्मात्यांची इच्छा होती की, अपूर्व अग्निहोत्रीच्या जागी सलमान खान आणि महिमाच्या जागी माधुरीला कास्ट केले जावे. ‘ये दिल दीवाना’ गाण्याच्या वेळी शाहरुख खूपच व्यस्त असल्यामुळे अधिकतर सीनमध्ये शाहरुखचे क्लोजअप सीनच शूट करण्यात आले होते. इतर सीन शाहरुखच्या जागी त्याच्या बॉडी डबलला (शाहरुखच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला) घेऊन शूट करण्यात आले होते.
आज शाहरुखला कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याचे स्वत:चे ‘रेड चिली एंटरटेनमेंट’ नावाचे प्रॉडक्शन हाऊस आहे. तसेच, तो एका सिनेमासाठी तब्बल 100 कोटींपेक्षा जास्त रुपये मानधन घेतो. तो आगामी काळात ‘जवान’ आणि ‘पठाण’ यांसारख्या सिनेमात झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस पुरती फसली, जेलमध्ये जाण्याची शक्यता
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रणवीरचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘कॅटरिना आणि दीपिका औकातीच्या बाहेरच्या’
‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉपची जबाबदारी घेणार, आमिर खानने नाकारले मानधनाचे इतके कोटी