Friday, December 8, 2023

बर्फी वाटा बर्फी ! दिशा परमार आणि राहुल वैद्यने दिला गोंडस मुलीला जन्म, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

बिग बॉस 14 फेम गायक राहुल वैद्य (rahul vaidy) आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ फेम दिशा परमार यांनी त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. दिशाने एका मुलीला जन्म दिला आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलीचा जन्म झाला. त्यामुळे हे जोडपे आणि त्यांचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. या जोडप्याने आपल्या मुलीचे स्वागत करताच ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली. या जोडप्याने पोस्ट करताच त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. त्याच्या पोस्टवर त्याचे अभिनंदन करताना चाहते आता त्याच्या मुलीवर खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

या जोडप्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही चांगली बातमी शेअर केली आणि लिहिले, ‘आम्हाला मुलगी झाली आहे. आई आणि मुलगी दोघीही निरोगी आहेत आणि पूर्णपणे बऱ्या आहेत. आम्ही आनंदी आहोत. कृपया बाळाला आशीर्वाद द्या.’ पोस्टमध्ये जोडप्याने बाल गणेशाचा एक गोंडस फोटो देखील शेअर केला आहे.

गायक राहुल राहुल वैद्य बिग बॉसमध्ये आल्यानंतर खूप चर्चेत आला होता. तो या शोचा विजेता होऊ शकला नसला तरी प्रेक्षकांची मने जिंकण्यात तो यशस्वी ठरला. तर दिशा परमार ‘बडे अच्छे लगते हैं’ या टीव्ही शोसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर 16 जुलै 2021 रोजी त्यांचे लग्न झाले. या जोडप्याचे लग्न अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडले, जे टीव्ही जगतातील खूप महागडे लग्न असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अभिनेत्री साई पल्लवीने केले गुपचूप लग्न, प्रसिद्ध दिग्दर्शकाशी बांधली लगीनगाठ
वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी हरवले होते करीनाचे हृदय, प्रेमात आईविरुद्ध जाऊन केली होती ‘ही’ गोष्ट

हे देखील वाचा