‘मेरे नसीब में तू है कि नही’ गाण्यावर दिशा पटानीचा जबरदस्त डान्स, व्हिडिओला काही तासातच लाखो हिट्स

बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी. दिशाने खूपच कमी काळात तिचे बॉलिवूडमधील स्थान पक्के केले आहे. तिने तिच्या अभिनयासोबतच बोल्डनेस आणि डान्सने प्रेक्षकांना वेड लावले आहे. २०१५ साली तेलुगू चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. दिशा सध्या चर्चेत येण्याचे कारण दिशांचे नुकतेच एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे.

दिशाने तिच्या यूट्यूब चॅनेलवर तिचा एक डान्स व्हिडिओ अपलोड केला आहे. ह्या व्हिडिओत तिने ८० च्या दशकात आलेल्या ‘नसीब’ चित्रपटातील ‘मेरे नसीब में तू है कि नहीं…’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. हा व्हिडिओ अपलोड करताना तिने लिहिले, ” हॅलो मित्रांनो ८० च्या दशकातील माझे सर्वात आवडते गाणे. ह्या गाण्यात मी माझ्या आवडत्या डान्स पार्टनरसोबत डिंपल कोटेसोबत डान्स करून मला खूप मजा आली. या गाण्याची कोरिओग्राफी अंकन सेनने केली असून, हरिकेश कोरीने व्हिडिओग्राफी केली आहे. मी अशा करते तुम्हाला आमचे हे गाणे नक्कीच आवडेल.”

दिशाने या व्हिडिओमध्ये जुन्या गाण्याला एका नव्या मॉडर्न ट्विस्टसोबत सादर केले आहे. तिचा या गाण्यातला डान्स पाहून फॅन्स थक्क झाले आहेत. या व्हिडिओवर अनेक लाइक्स आणि कमेंट्स येत आहे. काही फॅन्सने लिहिले, “वॉव”, तर काहींनी लिहिले, “दिशा खूपच स्ट्रॉंग दिसत आहे, मला वाटते तिच्यापेक्षा जास्त पावरफुल कोणी नाही”. अजून काहींनी लिहिले, ” तुझा डान्स, तुझा लुक!!! आय हाय.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

दिशाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मागील अनेक काळापासून तिच्या आणि टायगर श्रॉफच्या अफेयरबद्दल चर्चा होत आहे. त्यांना अनेक ठिकाणी सोबत पाहिले गेले आहेत. दिशा लवकरच सलमानसोबत ‘राधे’ या सिनेमात दिसणार आहे.

हेही वाचा-
द लेजेंड हनुमान  सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?
तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतंय स्पेलंडर  गाणं, रिलीज झाल्यापासून चार दिवसांत मिळालेत लाखो हिट्स
गुरु रंधावाच्या या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; हिट्स लाखोंच्या घरात
प्रीती झिंटाच्या  बुमरो बुमरो  गाण्यावर काश्मिरमध्येच थिरकली शहनाज गिल, व्हिडीओने सोशल मीडियावर मिळविल्या लाखो हिट्स

Leave A Reply

Your email address will not be published.