कलाकार जितकी मेहनत त्यांच्या भूमिकेसाठी घेतात तेवढीच किंबहुना त्याहून थोडी जास्त मेहनत ते त्यांच्या फिटनेस आणि आरोग्यासाठी घेतात. इंडस्ट्रीमध्ये जवळपास सर्वच कलाकार फिटनेस फीक्र म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियावर तर नेहमीच कलाकारांच्या रफ एँड टफ वर्कआऊटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आपल्याला देखील कलाकरांना पाहून त्यांच्यासारखी बॉडी, फिगर असावी असे अनेकदा वाटत असते. मात्र, आपण जर कलाकारांचे व्यायामाचे व्हिडिओ पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की, ते त्यांच्या शरीरावर किती मेहनत घेतात.
बॉलिवूडमधील बोल्ड एँड ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी दिशा पटानीसुद्धा तिच्या शरीराची आणि फिटनेसची खूप काळजी घेते. जिममध्ये जाऊन तासंतास घाम गाळताना दिसणाऱ्या दिशाचे देखील व्यायामाचे बरेच व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता पुन्हा तिचा एक जिममधला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बघताना नक्कीच सर्वांचे डोळे मोठे होणार आहेत.
दिशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा जिममधला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा चक्क ८० किलोचे वजन उचलताना दिसत आहे. दिशाने ८० किलो वजन उचलून स्कॉट्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना दिशाने लिहिले, “८० किलो १ रॅप, धन्यवाद राजेंद्र ढोले.”
दिशाच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत असून, फॅन्ससुद्धा तिला कमेंट्स करून चिअर करताना दिसत आहे. सोबतच इंडस्ट्रीमधील श्रॉफ परिवाराने दिशाने तोंडभरून कौतुक केले आहे. दिशाचा बॉयफ्रेंड असलेल्या टायगर श्रॉफच्या बहिणीने कृष्णा श्रॉफने लिहिले, “स्ट्रॉन्ग” (शक्तिशाली). दुसरीकडे आयेशा श्रॉफ यांनी लिहिले, “ही तीच मुलगी आहे, जिने रिकामे बार हातात घेऊन स्कॉट्स करायला सुरुवात केली होती. मेहनत.’ तसेच टायगरने लिहिले, “पुढची पातळी.”
दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘राधे’ सिनेमात झळकली होती. लवकरच ती जॉन अब्राहमसोबत ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे. शिवाय ती एकता कपूरच्या ‘केटीना’मध्ये देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’
-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती










