म्हशीच्या रेडकूला किस करतानाचा फोटो दिशा पटानीने केला शेअर; युजर म्हणाला, ‘त्याच्या जागी मी असतो तर…’

Disha patani share a calf kissing photo on social media


‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाने सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती बी टाऊनमधील एक ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. जेव्हापासून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे, तेव्हापासून तिने तिच्या अंदाजाने नेहमीच प्रेक्षकांना वेड लावले आहे. तिचा फिटनेस असो, अभिनय असो किंवा बिकिनी फोटो असो. तिचे सगळे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या फोटोने इंटरनेटचा पारा वाढवत असते. नुकताच तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती एका म्हशीच्या बाळाला किस करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर तिचे चाहते नेहमीच तिला खूप प्रेम देत असतात. तिच्या फोटोवर आणि व्हिडिओवर ते नेहमीच कमेंटचा वर्षाव करत असतात. तिने शेअर केलेला हा फोटो पाहून तिचे प्राण्यांप्रती असलेले प्रेम साफ दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने कोणतेच कॅप्शन दिले नाही.

दिशाने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे चाहते खूप कमेंट करून तिचे खूप कौतुक करत आहे. तिने आतापर्यंत शेअर केलेल्या फोटोपेक्षा हा फोटो खूपच सुंदर आणि वेगळा आहे. त्यामुळे सर्वांना हा फोटो खूपच आवडला आहे. एका युजरने कमेंट करून लिहिले आहे की, “ऍनिमल लव्हर.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “त्या म्हशीच्या बाळाचे नशीब किती चांगले आहे. मी जर त्याच्या जागी असतो, तर किती बरं झालं असत ना.” यातच काही लोक तिने कोरोना नियमांचे उल्लंघन केले आहे असे म्हणत आहेत.

दिशाने याआधी देखील तिच्या पाळीव मांजर आणि कुत्र्यासोबत फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंना देखील तिच्या चाहत्यांनी खूप प्रतिसाद दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना काळात नागरिकांना जागरूक करण्यासाठी ‘खिलाडी’ अक्षय कुमारने केला व्हिडिओ शेअर, सांगितल्या ‘या’ ५ टिप्स

-‘मोटी हो रहीं हूँ क्या मैं?’, कॉफी घ्यायला पोहोचलेल्या राखी सावंतचा व्हिडिओ व्हायरल

-‘डान्स दीवाने’च्या मंचावर शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित, सोबतच स्पर्धकांनीही दिली साथ


Leave A Reply

Your email address will not be published.