Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बोल्ड एँड ब्युटीफुल! बीचवरील रेतीने माखलेली दिसली दिशा पटानी; बिकिनीतील बोल्ड फोटोचा इंटरनेटवर बोलबाला

सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये टॉपची अभिनेत्री म्हणून दिशा पटानी ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये येऊन तिला फार काळ लोटलेला नसला, तरीही ती बॉलिवूड आणि फॅन्सची युथ आयकॉन झाली आहे. सोशल मीडियावर तर तिला लाखो लोकं फॉलो करतात. इंस्टाग्रामवर तिचे ४४.३ मिलियन फॉलोअर्स असून, ही संख्या सातत्याने वाढतानाच दिसत आहे. दिशा तिच्या सिनेमांसोबतच तिच्या बोल्ड लूकसाठी देखील ओळखली जाते. तिच्या सोशल मीडिया अकांऊटवर तिचे चिक्कार बोल्ड फोटो आपल्याला पाहायला मिळतील.

दिशा नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेचा विषय बनताना दिसते. आता देखील दिशेने पोस्ट केलेल्या फोटोमुळे ती प्रकाशझोतात आली आहे. दिशाने नुकताच तिचा बिकिनी घातलेला एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिचा हा फोटो एका बीचवरचा असून यात ती बीचवरील रेतीने पूर्ण माखलेली दिसत आहे.

दिशाच्या या बोल्ड आणि ब्युटीफुल फोटोचा सध्या इंटरनेटवर बोलबाला आहे. ऍनिमल प्रिंटच्या बिकिनीमध्ये दिशा अतिशय सुंदर दिसत असून, तिचे डोळे आणि सौंदर्य बघणाऱ्याला घायाळ करत आहे. दिशांच्या कमनीय बांध्यामुळे तिचा बिकिनी लूक अधिक मादक आणि आकर्षक दिसतो. हा फोटो शेअर करत फुलाचा एक ईमोजी पोस्ट केला आहे.

दिशाने तिचा हा फोटो शेअर केल्यानंतर काही मिनिटातच या फोटोला तीन लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले. आतापर्यंत तिच्या या फोटोने १५ लाख लाईक्सचा टप्पा ओलांडला आहे. शिवाय तिचा हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल देखील होताना दिसत आहे. दिशा नेहमीच तिचे बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. दिशाचा बिकिनी लूक सर्वच नेटकऱ्यांमध्ये आणि फॅन्समध्ये तुफान प्रसिद्ध आहे.

दिशा नेहमीच तिच्या फिटनेससाठी देखील चर्चेत असते. अनेकदा ती इंस्टाग्रामवर तिचे व्यायाम करतानाचे फोटो शेअर करत असते. नुकताच तिने तिचा जिममधला एक विडिओ पोस्ट केला होता. ज्यात तिने ८० किलोचे वजन उचलले होते. दिशा आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांचे अफेअर असल्याच्या अनेक बातम्या नेहमी मीडियामध्ये असतात.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर दिशाचा ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आगामी काळात दिशा ‘योद्धा’, ‘मलंग २’ आदी मोठ्या आणि चांगल्या सिनेमांमध्ये झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ऋचा चड्डाशी लग्न न करण्याबाबत अली फजलने सांगितले ‘मोठे’ कारण; म्हणाला, ‘आम्ही आधी पैसे…’

-ओळखा पाहू कोण? सोशल मीडियावर रंगलीय ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याच्या फोटोचीच चर्चा

-चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार संजय लीला भंसाळीचा ‘गंगुबाई काठियावाडी’; पाहिजे तितकी वाट बघायला निर्मात्यांची तयारी

हे देखील वाचा