दिशा पटानीने फ्लॉन्ट केलं टोन्ड फिगर; पाहून टायगर श्रॉफला अनावर झाल्या भावना, म्हणाला…


अभिनेत्री दिशा पटानी (Disha patani) हिची गणना बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींमध्ये होते. दिशा नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ती चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. चाहतेही तिच्या फोटो आणि व्हिडिओवर खुप पसंती दर्शवतात. दिशा पटानी तिच्या ग्लॅमरस फोटोेने चाहत्यांना वेड लावते, तर दुसरीकडे तंदुरुस्त राहण्याची प्रेरणाही देते. आता अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा पटानीचा आकर्षक लुक तर दिसत आहेच, पण तिची जबरदस्त फिटनेसही यात पाहायला मिळत आहे.

टायगर श्रॉफने केली कमेंट
दिशा पटानीने शेअर केलेला हा व्हिडिओ एक इंस्टाग्राम रील आहे. त्यामध्ये तिने गुलाबी रंगाचे शॉर्ट्स आणि स्पोर्ट्स ब्रा घातली आहे. या व्हिडिओमध्ये ती स्टायलिश अंदाजात आरशासमोर चालताना दिसत आहे. तिने हा व्हिडिओ स्वत: च शूट केला आहे. नेहमीप्रमाणे दिशा पटानी या व्हिडिओमध्ये खूप सुंदर दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘पीचस’ गाणं सुरू आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओवर टायगर श्रॉफने (Tiger Shroff) फायर आणि टाळ्यांचे इमोजी पोस्ट केले आहे. (disha patnai shared latest video on instagram tiger shroff gave reaction)

दिशाच्या व्हिडिओवर चाहत्यांनी खूप प्रेम दाखवले आहे. तुम्हाला माहितीच असेल की, दिशा पटानीचे नाव टायगर श्रॉफ सोबत जोडले जाते. परंतु हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगतात. दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दिशा फिटनेस फ्रिक आहे आणि तिच्या फिटनेसने खूप प्रोत्साहित करते.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!