Monday, September 25, 2023

संतापजनक! युक्रेनच्या गायिकेकडून तिरंग्याचा अपमान, लाईव्ह कॅान्सर्टमध्ये फेकला झेंडा; पुण्यात तक्रार दाखल

मंगळवारी (दि. 15 ऑगस्ट) देशभरात 77वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा केला गेला. छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला. यादरम्यान अनेक मोठे कलाकार आनंद साजरा करताना दिसले. मात्र, युक्रेनची गायिका उमा शांतीला हा स्वातंत्र्यदिन चांगलाच महागात पडला आहे. गायिका वादात सापडली आहे. उमावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील मुंडवा येथील एका क्लबमध्ये संगीत कार्यक्रमादरम्यान गायकाने भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. या आरोपावरून तिच्यावर आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, युक्रेनियन गायिका उमा शांतीने (Uma Shanti) तिरंग्याचा अपमान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वणव्यासारखा व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

पोलिसांनी युक्रेनियन गायिका उमा शांती आणि कार्यक्रमाचे आयोजक कार्तिक मोरिन यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अनादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील मुंडवा परिसरात आयोजित संगीत कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा कथित अवमान झाल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुंडवा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना उमा शांती तिरंगा फडकावत होत्या, त्यानंतर तिने दोन्ही हातात तिरंगा घेऊन नृत्य केले आणि नंतर तो प्रेक्षकांच्या दिशेने फेकला. तिरंगा फेकण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. गायक आणि कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered in Pune for insulting the tricolor flag by famous singer Uma Shanti)

अधिक वाचा- 
‘देवरा’मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आला समोर; ज्युनियर एनटीआरने वाढदिवसानिमित्त सैफला दिली भेट
टायगर श्रॉफच्या सुपरबोल्ड बहिणीपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या- Photo

हे देखील वाचा