Friday, December 8, 2023

‘मी यापूर्वी अनेक चुका केल्यात;’…म्हणत दिव्या दत्ताने सांगितला बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रवास

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या दत्ता हिने आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये वेगळीच छाप सोडली आहे. तिने अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने आपल्या जमदार अभिनयाने भूमिकांमध्ये आपली धमक दाखवल आहे. तिच्या प्रसिद्ध भूमिकांसाठी ती सतत ओळखली जाते. बॉलिवूडसारख्या इंडसट्रीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी तिने अनेक कठीण परिस्थितीचा सामना करुन आज ती प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी ओळखळी जाते.

अभिनेत्री दिव्या दत्ता (Divya Dutta) हिने नुकतंच एका मुलाखतीदरम्यान असे काही वक्तव्य केले आहे ज्यामुळे अभिनेत्री खूपच चर्चेत आली आहे. तिने (दि, 11 नेव्हेंबर) दिवशी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘अँथ द एंड’ मध्ये झळकली आहे. तेव्हा तिने सांगितले होते की, “मी यापूर्वी अनेक चुका केल्या आहेत. माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला अनेक गोष्टी बोलण्यात आल्या होत्या. मी उंच नाही पण मी बस्टी आहे, त्यामुळे सुरुवातीला जरा कठीण होते. पण हळूहळू तुम्हाला तुमचा मार्ग सापडतोच.”

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, “जेव्हा तुमच्या कामाचे कौतुक केले जाते, तेव्हा तुमचा आत्मविश्वास अजून वाढतो आणि मग हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरची त्वचा फुलते आणि तुमच्या शरिराला काय हवं आहे समजते. लोकांना हळूहळू मला स्वीकारलं याचा मला खूप आनंद आहे. हा बराच लांबचा प्रवास होता. जेव्हा मी मागे वळून पाहाते, तेव्हा मला खूप छान वाटते की, मला लोक वेगळ्या नजरेने पाहातात जिथे मला शोस्टॉपर म्हणून या ग्लॅमरस कार्यक्रमांसाठी बोलवले जाते.”

 

View this post on Instagram

 

अभिनेत्री दिव्या दत्ताने 1994 साली ‘इश्क में जिना इश्क में मरना’ प्रदर्शित झालेला चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये तिने सह्यक भूमिका निभावली होती. यानंतर तिने ‘वीर झारा’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘दिल्ली’ सारख्या अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम कोले. दिव्याने नुकतंच ‘अँथ द एंड’ मध्ये काम केले आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत मुकुल देव (Mukul Dev), देव शर्मा (Dev Sharma), समिक्षा भटनागर (Samiksha Bhatnagar), दीपराज राणा (Deepraj Rana), युगांत बद्री पांडे (Yugant Badri Pandey) आणि अरुन बक्षी (Arun Bakshi) यांनी दखिल मुख्य भूमिका निभवल्या आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आंटी तर फुल्ल फॅशेनमध्ये;’ म्हणत, मलायाका अरोराची ट्रोलर्सने उडवली खिल्लीहॉट! अभिनेत्री हुमा कुरेशीने फ्लॉन्ट केला सिंपल लुक, नारंगी रंगात दिसतेय ऑरेन्ज

हे देखील वाचा