Friday, February 3, 2023

जेव्हा कपिल शर्माने सांगितला होता ४० कोटी बुडण्याचा दुःखद प्रसंग, अजय देवगणने दिला होता ‘हा’ सल्ला

कपिल शर्माच्या प्रसिद्ध कॉमेडी शोमध्ये, चित्रपट जगतातील कलाकार अनेकदा त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी पोहोचतात आणि प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. कपिल शर्माची कॉमिक टायमिंग लोकांना हसवते. कपिलच्या शोमध्ये अनेकवेळा तो लोकांची मस्करी करतो तसेच तो त्यांचे भरभरून कौतुक देखील करतो. एकदा असेच काहीसे घडले होते, जेव्हा बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याच्या कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये पोहोचला तेव्हा कपिलने त्याला असा प्रश्न विचारला की, त्याला त्याचे दुःखाचे दिवस आठवले.

कॉमेडी किंग कपिल शर्मा खूप मस्तीखोर आहे, तर अभिनेता अजय देवगण खूप शांत माणूस आहे. पण या दोन्ही सेलिब्रिटींमध्ये एक समानता आहे की, दोघेही त्यांचा वाढदिवस २ एप्रिल रोजी साजरा करतात. या वर्षी २ एप्रिल रोजी, जिथे कपिल ४१ वर्षांचा होईल, तिथे अजय त्याचा ५३ वा वाढदिवस साजरा करेल. दोघे एका जुन्या व्हिडिओमध्ये एकत्र दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये कपिलच्या शोमध्ये अभिषेक बच्चनही अजयसोबत पाहुणे म्हणून दिसत आहे.

अजय देवगण आणि अभिषेक बच्चन गेल्या वर्षी त्यांच्या ‘द बिग बुल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचले होते. शो दरम्यान कपिलने अजयला विचारले की, ‘तू द बिग बुलसाठी अभिषेकला का कास्ट केलेस, तू स्वतः ते करू शकला असतास.” यावर अजय देवगण म्हणाला की, “कारण मला वाटले की, अभिषेक बच्चन या भूमिकेसाठी योग्य आहे आणि प्रत्येक चित्रपट तुम्ही स्वतःसाठी विचार करून बनवत नाही. कोणती स्क्रिप्ट कोणाला शोभते आणि कोणती नाही याचाही विचार करा.”

अजय देवगणचे म्हणणे ऐकून कपिल म्हणतो की, “मी स्वतःचा विचार करून बनवले होते, मग माझे काम बिघडले.” अजय कपिलला सांगतो की, “तुझं मन पुढे ठेऊ नकोस.” यावर कपिल म्हणतो, “मला तेव्हाच समजते जेव्हा माझे पैसे बुडतील आणि मला खूप समजले आहे.. मला ४० कोटी समजले आहेत.” अशाप्रकारे त्यांनी संवाद केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा