Tuesday, March 5, 2024

‘आंटी तर फुल्ल फॅशेनमध्ये;’ म्हणत, मलायाका अरोराची ट्रोलर्सने उडवली खिल्ली

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फॅशेनमुळे सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. तिच्या पहड्यांमुळे तिला अनेकदा ट्रोल देखिल करण्यात आले होते. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते तिला आपल्या बोल्ड लुकमुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पुन्हा एकदा अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

शनिवार (दि.12, नोव्हेंबर) दिवशी टेलिव्हिजन अभिनेता सिद्धांत वीर (siddhant veer) याच्या अंत्यदर्शनासाठी अभिनेत्री मलायका अरोरा (Malayka Arora) हिने हजेरी लावली होती. त्यावेळीच अभिनेत्रच्या कपड्यांची फॅशन पाहून प्रेक्षकांनी तीला धरेवर धरले आहे. मलायका सिद्धांतच्या अंत्य दर्शनासाठी अभिनेत्याच्या घरी गेली होती, तेव्हा त्या ठिकाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, अशा दु:खाच्या वेळी देखिल तिने आपली फॅशेन सोडली नाही त्यामुळे या व्हिडिओवर नेटकऱ्यांची कमेंट करत तिला ट्रोल केले आहे.

सिद्धांतच्या अंत्यदर्शनावेळी मलायकाने निळ्या रंगाचा फ्लोरल लॉंग ड्रेस परिधान केला होता. ड्रेसचा गळा मागच्या बाजून खूप मोठा होता आणि उघडा होता, गळ्यामध्ये स्कार्फ गुंडाळला होता. मलायकाचा असा लुक पाहून काही नेटकरी तिच्यावर रागावले आहेत त्यांनी व्हिडिओवर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “कोणाच्याही अंत्यदर्शनासाठी अशाप्रकारचे कपडे परिधान करुन जाले हे योग्य नाही आणि ही आंटी तर फुल्ल फॅशनमध्ये आली आहे.”, अनेक नेटिझन्सने तिला ट्रोल केलं असलं तरी काहींनी अभिनेत्रीची बाजू घेतली असून कमेंट करत लिहिले की, “कदाचित ती गडबडीत त्याच्या घरी गेली असेल.” दुसऱ्यानं म्हटलं की, “तिच्या कपड्यांपेक्षा ती वेळ काढून तिथे पोहोचली हे जास्त महत्वाचं आहे.”

 

View this post on Instagram

 

अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशी हा शुक्रवारी ( दि, 11 नोव्हेंबर) दिवशी जिममध्ये वर्कआऊट करत असताना त्याला हृदय विकाराच्या झटका आल्याने त्याला त्वरित रुग्नालयात नेले आणि शनिवर (दि,12 नोव्हेंबर) दिवशी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हॉट! अभिनेत्री हुमा कुरेशीने फ्लॉन्ट केला सिंपल लुक, नारंगी रंगात दिसतेय ऑरेन्ज
प्रतीक बब्बरने केले असे फोटोशूट की, नेटकऱ्यांनी केली थेट उर्फी जावेदशी तुलना

हे देखील वाचा