Saturday, March 2, 2024

‘असंवेदनशील’ म्हणत नेटकऱ्यांनी ये हे मोहब्बते फेम ‘या’ टेलिव्हिजन अभिनेत्रीला केले जोरदार ट्रोल

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसत नसली तरी ती इतर अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील ती सक्रिय आहे. मात्र नुकतीच दिव्यांका अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागली आणि तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नक्की काय आहे प्रकरण. वाचा ही बातमी.

दिव्यांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती असे काही बोलली आहे जे ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. याच व्हिडिओमुळे ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. दिव्यांकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने भूकंपावर आनंद व्यक्त केल्याने तिच्या असंवेदनशीलपणामुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

‘ये है मोहब्बतें’ फेम अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला मोठी फॅन फॉलोविंग देखील आहे. अशातच तिने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला ज्यात उत्तर भारतात नुकत्याच जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांवर तिने भाष्य केले आहे. तिथे निर्माण झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घरातून बाहेर आले. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान होते. हे झटके देशात अनेक ठिकाणी जाणवले.

यानंतर दिव्यांकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत भूकंपाबद्दल तिची उत्सुकता दाखवली. ती या व्हिडिओमध्ये म्हणते, “हे खूप रोमांचक आहे. मी पहिल्यांदाच भूकंपाचा अनुभव घेत आहे. प्रत्येकजण आपल्या घरातून खाली आला आहे. जोवर परिस्थिति आणखी गंभीर होत नाही तोपर्यंत हे रोमांचक आहे.” यानंतर ती तिथल्या लोकांच्या प्रतिक्रियाही घेते.

या व्हिडिओनंतर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. तिच्या व्हिडिओला कमेंट्स करताना लोकांनी तिला असंवेदनशील म्हटले आहे. एकाने लिहिले, “तुला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत आहे का? लोकांचा जीव धोक्यात आहे आणि तू काय करते?”, अजून एकाने लिहिले, “तू भावनाशून्य झाली आहेस, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.” या ट्रोलिंगवर अजून दिव्यांकाने काहीही उत्तर दिले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

क्या बात है! ‘हा’ साऊथ सुपरस्टार झाला मुंबईकर, खरेदी केले तब्बल ७० कोटींचे आलिशान घर

गुपित झाले उघड! ‘टायगर 3’ मधील शाहरुखचा कॅमिओ सीन लीक, पठाणच्या मदतीने टायगर करणार पलायन

हे देखील वाचा