सर्वांना आपल्या बालपणाशी खूप प्रेम असतं. विशेष म्हणजे मोठे झाल्यानंतर लहानपणीच्या फक्त आठवणी आपल्या सोबत राहतात. या खास आणि गोड आठवणी आपण फोटोंच्या माध्यमातून आपल्या जवळ बांधून ठेवतो. कधी पहावंस वाटलं, तर ती आठवणींची पेटी खोलून आपण जुन्या दिवसांच्या आठवणीत विलीन होऊन जातो. जसे आपण बऱ्याचदा पाहतो, की कलाकारदेखील या लहानपणीच्या गोड आठवणी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतात. असाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा गोंडस फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मराठीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध कॉमेडी शो म्हटलं की डोक्यात पहिलं नाव येतं, ते ‘चला हवा येऊ द्या’ या शोचं. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’, हे शब्द बोलत ‘चला हवा येऊ द्या’ या शोने आख्ख्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडले. शोच्या या कामगिरीमध्ये, इतर कलाकारांप्रमाणेच अभिनेत्री श्रेया बुगडेचाही मोलाचा वाटा आहे. विविध कलाकारांची हुबेहुब नक्कल करून तिने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.
श्रेया बुगडेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूप गोड दिसत आहे. हा फोटो पाहून, तिची ओळख पटनेही अवघड जात आहे. मात्र तरी हा फोटो नेटकऱ्यांना खूप आवडल्याचे दिसून येत आहे. हा गोड फोटो शेअर करत, श्रेयाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं अभिनेत्री बनायचं.”
श्रेयाने ‘वाटेवरती काचा गं’ या नाटकाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तिने ‘तू तिथे मी’ मधून टीव्हीवर पदार्पण केले. त्यानंतर ती ‘फू बाई फू’, ‘माझे मन तुझे झाले’ अशा शोमध्ये दिसली. मात्र, तिला खरी ओळख ‘चला हवा येऊ द्या’ या शोने मिळवून दिली. क्वचितच लोकांना माहिती असेल की, श्रेयाने गुजराती मालिकेमध्येही काम केले आहे. ती ‘छुत्ता छेडा’ या गुजराती मालिकेत झळकली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मोठी बातमी! भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादववर गुन्हा दाखल; महिलांबद्दल अश्लील गाणे बनवल्याचा आरोप










