Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड Made In Heaven 2: राधिकाच्या दलित महिलेच्या भूमिकेबद्दल प्रकाश आंबेडकरांचे भाष्य; ट्वीट करत म्हणाले…

Made In Heaven 2: राधिकाच्या दलित महिलेच्या भूमिकेबद्दल प्रकाश आंबेडकरांचे भाष्य; ट्वीट करत म्हणाले…

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये राधिका आपटे हिच्या नावाचाही समावेश होतो. राधिकाने आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या, ज्यामुळे ती आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. तिच्या दमदार अभिनयाला सर्व क्षेत्रातून दाद मिळते. आता राधिका आपटे ही ‘मेड इन हेव्हन 2’ या वेबसीरिजमध्ये झळकत आहे. अशात सीरिजमधील तिच्या एका पात्राविषयी सर्वात मोठी प्रतिक्रिया आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राधिका आपटे (Radhika Apte) हिच्या पात्राविषयी तिचे कौतुक केले आहे.

काय म्हणाले आंबेडकर?
‘मेड इन हेव्हन’ (Made In Heaven) या वेबसीरिजचा बहुप्रतिक्षित दुसरा भाग अलीकडेच रिलीज झाला आहे. ‘मेड इन हेव्हन 2‘ (Made In Heaven 2) या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीरिजमधील काही सीन इंटरनेटवर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. कारण, चाहते सीरिजच्या दुसऱ्या भागातील 7 वेगवेगळे एपिसोड पाहत आहेत. अशात सीरिजमधील पाचव्या एपिसोडने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये अभिनेत्री राधिका आपटे साकारत असलेले पात्र पल्लवी (Pallavi) दलित नवरीच्या रूपात सजले आहे.

आता दलित नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी या एपिसोडचे आणि दलित पात्राच्या चित्रणाचे तोंडभरून कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, दिग्दर्शक नीरज घेवान यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडेच प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत एपिसोडमधील दोन फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी लिहिले आहे की, “मला दलित महिलेचे पात्र पल्लवीची दृढता, अवहेलना आणि प्रतिकार खूपच आवडला. तुम्ही सर्व वंचित आणि बहुजनांनी ही सीरिज पाहिली पाहिजे, तेव्हाच तुम्ही तुमची ओळख सांगू शकता आणि तुम्हाला राजकीय महत्त्वही मिळेल. जय भीम.”

विशेष म्हणजे, दिग्दर्शक नीरज घेवान (Neeraj Ghaywan) यांनीही आंबेडकरांच्या या पोस्टवर लक्षवेधी प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्वीट रिट्वीट करत लिहिले की, “हेच सर्वस्व आहे! खूप खूप धन्यवाद सर! तुमची ही प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप खूप महत्त्वपूर्ण आहे.”

खरं तर, ‘मेड इन हेव्हन 2’ या वेबसीरिजची निर्मिती आणि दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव, नीरज घेवान, नित्या मेहरा, रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी केले आहे. (dr babasaheb ambedkar grandson prakash ambedkar praise for actress radhika apte dalit wedding in made in heaven 2)

महत्त्वाच्या बातम्या-
आलिया भट्टचा गौप्यस्फोट! लेकीच्या जन्मानंतर रणबीरकडून करवून घेतलेलं ‘हे’ काम, लगेच वाचा
‘OMG 2’चं नशीब फळफळलं! स्वातंत्र्यदिनाचा फायदा घेत भरून काढली चार दिवसांची कसर, पाहा किती कोटी छापले

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा