Sunday, October 1, 2023

आलिया भट्टचा गौप्यस्फोट! लेकीच्या जन्मानंतर रणबीरकडून करवून घेतलेलं ‘हे’ काम, लगेच वाचा

बॉलिवूडमध्ये आघाडीच्या सुपरहिट जोडप्यांमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नावाचा समावेश होतो. हे सुप्रसिद्ध कलाकार जोडपे सध्या त्यांच्या पालकत्वाचा आनंद लुटत आहेत. अभिनेत्री आलियाने मागील वर्षी म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये मुलगी राहा हिला जन्म दिला होता. लेकीच्या जन्मानंतर कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अनेकदा जेव्हाही हे जोडपं माध्यमांपुढे येतं, तेव्हा आपल्या लेकीविषयी नक्कीच बोलताना दिसतात. आता आलियाने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. तिने सांगितले आहे की, मुलीच्या जन्मानंतर तिने रणबीरकडून कोणते काम करवून घेतले होते.

काय म्हणाली आलिया?
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने एका मुलाखतीत राहा (Raha) हिच्याविषयी भरमसाठ चर्चा केली. तिने मुलाखतीत आपली त्वचा आणि मेकअप रुटीनविषयीही चर्चा केली. यादरम्यान आलिया तिच्या पापण्या कर्ल करताना दिसली. यादरम्यान तिने सांगितले की, जेव्हा राहाचा जन्म झाला होता, तेव्हा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला म्हटले होते की, राहाच्या पापण्या मोठ्या आहेत की नाहीत, हे तपासावे.

मोठ्या आहेत राहाच्या पापण्या
आलिया पुढे बोलताना म्हणाली की, तिच्या रणबीरसारख्या मोठ्या पापण्या नाहीयेत, पण तिची लेक वडिलांवर गेली आहे. राहाच्या पापण्या मोठ्या आहेत. अभिनेत्री अनन्या पांडे हिनेदेखील अलीकडेच सांगितले होते की, आलियाची लेक खूपच सुंदर आणि गोड आहे.

अभिनेत्रीच्या कामाविषयी
आलिया भट्ट हिच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ती अखेरची रणवीर सिंग याच्यासोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. करण जोहर दिग्दर्शित या सिनेमात आलिया-रणवीरसोबत शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

विशेष म्हणजे, नुकताच आलियाचा ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा हॉलिवूडचा पदार्पणातील सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (actress alia bhatt reveals when daughter raha was born she asked ranbir kapoor to check her eyelashes)

महत्त्वाच्या बातम्या-
‘OMG 2’चं नशीब फळफळलं! स्वातंत्र्यदिनाचा फायदा घेत भरून काढली चार दिवसांची कसर, पाहा किती कोटी छापले
सनी पाजीच्या ‘Gadar 2’ने उडवला बार! 15 ऑगस्टच्या दिवशी छापले ‘एवढे’ कोटी, कमाई 200 कोटींच्या पार

हे देखील वाचा