बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या आईच्या निधनाने खूप दु:खी झाली आहे. आईचे निधन होऊन चार दिवस झाले नाहीत दरम्यान, राखीचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती खूप रडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये राखी तिचे लग्न धोक्यात आल्याचे ओरडत आहे. राखी सावंतसोबत असे काय घडले की, ती इतकी अस्वस्थ झाली? असे प्रश्न चाहत्यांना पडत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये राखी सावंत (rakhi sawan) आपले वैवाहिक जीवन धोक्यात आल्याचे सांगत असून ढसाढसा रडत आहे. राखी म्हणाली, “माझे लग्न धोक्यात आहे. मला माझे लग्न वाचवायचे आहे. लग्न म्हणजे विनोद किंवा खेळ नाही. माझ्या आयुष्यात येऊन कोणाला काय मिळते. माझ्यावर अत्याचार करू नका मी खूप अस्वस्थ आहे.”
हा व्हिडिओ पाहून साेशल मीडिया युजर्स प्रचंड संतापले आहेत. त्यांच्या मते, जिच्या आईला जाऊन चार दिवस उलटले नाहीत, ती नवीन गोष्टींबद्दल कशी काय रडू शकते. संपूर्ण व्हिडिओमध्ये राखी रडताना आणि ओरडताना दिसत आहे. राखीचा हा व्हिडिओ पाहून एका युजरने लिहिले की, ‘आईला जाऊन तीन दिवस उलटले नाहीत आणि तू पुन्हा ड्रामा मोडमध्ये आली, हे खूप वेदनादायक आहे.’ तर दुसरा युजर म्हणाला, ‘आता तू नवीन ड्रामा कर.’
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी राखीने दावा केला होता की, तिने बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी खानसोबत लग्न केले आहे. तिने लग्नानंतर धर्म बदलला आणि आपले नाव फातिमा ठेवले. या कोर्ट मॅरेजवर आदिल सुरुवातीला मौन बाळगून होता. मात्र, काही दिवसांनी आदिलनेही या लग्नाला होकार दिला. (dramaqueen rakhi sawan crying for adil durrani khan says her marriage is in trouble after her mother jaya bheda death)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
Union Budget 2023| अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या अर्थसंकल्पावर आरोह वेलणकरने शेअर केलं ट्वीट; म्हणाला…
अथिया अन केएल राहुलने केले पायजमा आणि बाथरोबमध्ये फोटोशूट; लग्नानंतर पहिल्यांदाच दिसले मॅगझिन कव्हरवर










