‘८ वर्ष मैत्रीची, ८ वर्ष प्रेमाची…!’ ‘दुनियादारी’ला ८ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्वप्नील जोशीकडून खास पोस्ट शेअर


संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ हा चित्रपट प्रचंड हिट ठरला. कॉलेजमधील किशोरवयीन मुलांच्या मैत्रीचे दर्शन घडवणारा हा चित्रपट आजतागायत प्रेक्षकांच्या स्मरणात जशास तसा आहे. चित्रपटाची कथा आणि यातील कलाकारांच्या अभिनयाचे सर्वांचीच वाहवा मिळवली होती. एकंदरीत या चित्रपटाने मराठी चित्रपटांची परिभाषाच बदलून टाकली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करणाऱ्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाला, रिलीझ होऊन नुकतीच ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्त या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या स्वप्नील जोशीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने चित्रपटातील ‘जिंदगी जिंदगी’ या गाण्याची एक छोटीशी क्लिप शेअर केली आहे. हा व्हिडिओ शेअर करत स्वप्नीलने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “८ वर्ष मैत्रीची…८ वर्ष प्रेमाची…’दुनियादारी’ची ८ वर्ष साजरी करताना.” असे म्हणत त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

स्वप्नील जोशीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि राजेश्वरी खरातने देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच चाहतेही व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला ९२ हजाराहून अधिक व्ह्यूज, तर २९ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. (duniyadari movie completed 8 years swapnil joshi shared special post)

या चित्रपटात स्वप्निल जोशीसोबतच सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, उर्मिला कोठारे, जितेंद्र जोशी आदी कलाकार मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाप्रमाणेच यातील सर्व गाणी देखील सुपरहिट झाली होती. आजही ही गाणी तितक्याच आवडीने ऐकली जातात. हा चित्रपट तब्बल ४० आठवडे चित्रपटगृहात चालला होता, तर चित्रपटगृहाच्या बाहेर हाऊसफुलचे दृश्य पाहायला मिळायचे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया

-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास


Leave A Reply

Your email address will not be published.