तब्बल आठ वर्षांनंतर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीझ झाला आहे. ट्रेलरसोबत व्हिलनची एन्ट्री झाली आहे. हा चित्रपट २९ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीझ होणार आहे. याआधी चित्रपटाचे पोस्टर रिलीझ करण्यात आले होते, ज्यामध्ये जॉन अब्राहम (John Abraham) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) खतरनाक फॉर्ममध्ये दिसले होते. दुसरीकडे बुधवारी (२९ जून) आणखी एक पोस्टर रिलीझ करण्यात आले, ज्यामध्ये तारा सुतारियाचा (Tara Sutaria) ग्लॅमरस अवतार दाखवण्यात आला आहे. चित्रपटाच्या पोस्टरप्रमाणेच त्याचा ट्रेलरही तुमच्या होश उडवण्यास पुरेसा आहे.
साल २०१४मध्ये रिलीझ झालेल्या ‘एक था व्हिलन’चा खलनायक रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) याच्यापासून ट्रेलरची सुरुवात होते. सांगितले जाते की, आठ वर्षांपूर्वी व्हिलनची कथा सुरू झाली होती. ही कथा संपली असे तुम्हाला वाटायचे, पण व्हिलन परत आला नाही. तो त्या मुलींना टार्गेट करतो, ज्या एकतर्फा प्रेमात आहेत. हा व्हिलन तुटलेल्या हृदयांचा मसिहा बनून आला आहे. (ek villain returns trailer out)
यावेळीही चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. यात लव्हस्टोरीसोबत क्राईम आणि सस्पेन्सचा अतुलनीय मेळ पाहायला मिळणार आहे. ट्रेलर पाहून असे दिसते की, अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम एकमेकांचे शत्रू आहेत. त्याचबरोबर तारा सुतारिया आणि दिशा पटानी (Disha Patani) देखील सस्पेन्सफुल पात्रांमध्ये दिसत आहेत. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षक त्याचा ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुक होते. जबरदस्त ट्रेलरमुळे आता लोकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.
अभिनेता सिद्धार्थ कपूर (Sidhharth Kapur), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रितेश देशमुख अभिनित चित्रपट ‘एक व्हिलन’ २०१४ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला. ‘एक व्हिलन’चे दिग्दर्शन मोहित सुरीने केले होते आणि आता पुन्हा एकदा मोहित सुरी ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा सीक्वल घेऊन आला आहे. ‘एक व्हिलन’ हा सुपरहिट चित्रपट होता. आता हा चित्रपटही याच पद्धतीने हिट होणार की नाही, हे २९ जुलैलाच कळेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा