Sunday, December 8, 2024
Home अन्य BREAKING! प्रसिद्ध अभिनेत्याचे कार अपघातात निधन, तीन कलाकार गंभीररीत्या जखमी; सिनेसृष्टीत शाेककळा

BREAKING! प्रसिद्ध अभिनेत्याचे कार अपघातात निधन, तीन कलाकार गंभीररीत्या जखमी; सिनेसृष्टीत शाेककळा

गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीतून एकामागून एक स्टार्सच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत. अलीकडेच टीव्ही कलाकार आदित्य सिंग राजपूत, वैभवी उपाध्याय, नितेश पांडे, अभिनेता-दिग्दर्शक आमिर रझा हुसैन आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलाेचना यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. त्याचवेळी, आता इंडस्ट्रीतून आणखी एक वाईट बातमी समाेर आली आहे. मल्याळम प्रसिद्ध अभिनेता कोल्लम सुधी यांच्या कारला अपघात झाला असून या अपघात अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य 3 कलाकार देखील जखमी झाले आहेत.

कोल्लम सुधी (kollam sudhi) यांच्या कारचा अपघात साेमवारी (दि. 5 जून)ला त्रिशूरमधील कपमंगलम येथे झाला. एका कार्यक्रमावरून घरी परतत असताना अभिनेता त्यांचे साेबती उल्लास, बिनू आदिमाली, आणि महेश यांच्यासाेबत हाेते.

माध्यमातील वृत्तानुसार, कोल्लम सुधी यांची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहकाला धडकली. अशात या अपघातात अभिनेत्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, या दरम्यान त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे अभिनेत्याचे साेबती उल्लास, बिनू आदिमाली, आणि महेश हे अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aju Varghese (@ajuvarghese)

काेल्लम सुधी यांनी 2015मध्ये रिलीज झालेल्या ‘कंथारी’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ‘कुट्टनादन मारप्पा’, ‘थिटा रप्पई’, ‘कट्टापनायाले ऋत्विक रोशन’,’वकाथिरिवू’, ‘अॅन इंटरनॅशनल लोकल स्टोरी’, यांसारख्या चित्रपटांमध्ये काेल्लम यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली. अशात आता त्यांच्या मृत्यूने सिनेसृष्टीत शाेककळा पसरली आहे.(malyalam actor kollam sudhi died in car accident)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वाढदिवस विशेष : बॉलिवूडचा कॉमेडी किंग विजय राजचा, असा आहे थक्क करणारा प्रवास

BIRTHDAY SPECIAL | रंभाने अभिनय सोडून केले होते लग्न, घटस्फोट आणि आत्महत्येच्या बातम्यांनी वेधले होते लक्ष

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा