हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता असलेल्या मेनी कोटो यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांना त्यांच्या ’24’ या सिरीजसाठी बेस्ट ड्रामा विभागात एमी पुरस्कार मिळाला होता. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका माहितीनुसार त्यांचे निधन ९ जुलै रोजी त्यांच्या पसाडेना येथील राहत्या घरी झाले. मेनी हे स्वादुपिंडाच्या कॅन्सरने ग्रस्त होते.
मेनी कोटो यांनी फॉक्सच्या एआय ड्रामा असलेल्या ‘नेक्स्ट’ची सहनिर्मिती केली होती. तर ते डेक्सटर, स्टार ट्रेक: एंटरप्राइज, अमेरिकन हॉरर स्टोरी आणि इतर अनेक प्रोजेक्ट्सचे एपी देखील होते. मेनी यांच्या निधनामुळे हॉलिवूडमध्ये दुःखद वातावरण आहे. त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार मेनी हे जवळपास १३ महिने कॅन्सरशी लढले आणि अखेर ते ती लढाई हरले आणि त्यांचे निधन झाले.
हवाना, क्युबा इथे मॅन्युअल हेक्टर कोटो यांचा जन्म झाला. ते प्राइम टाइम मधल्या सर्वात प्रमुख लेखकांपैकी आणि निर्मात्यांपैकी एक होते. मेनी यांनी २००५ साली ’24’च्या पाचव्या सीझनसाठी सर्वोत्कृष्ट ड्रामा सेरीजचा एमी पुरस्कार पटकावला आणि या ’24 लीगसी’ची सह निर्मिती केली. कोटो यांनी ‘अमेरिकन हॉरर स्टोरी’चे कार्यकारी निर्माता म्हणून काम करत या शोचे चार सिझन बनवले. ‘अमेरिकन हॉरर स्टोरीज’च्या दोन सिझनची निर्मिती त्यांनी केली.
मेनी कोटो यांनी ‘डेक्स्टर’ या सीरिजचे शेवटचे तीन सिझन आणि ‘स्टार ट्रेक: एंटरप्राइज’चे शेवटचे दोन सिझन मध्ये काम देखील केले होते. कोटो यांनी १९९२ साली ‘डॉ’चे सहलेखन आणि दिग्दर्शन देखील केले होते.
अधिक वाचा-
–शोएब इब्राहिम पत्नी अन् चिमुरड्याला घेऊन रुग्णालयातून आला बाहेर, फोटो व्हायरल
–‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल