सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) यांनी २००४ साली एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांचा घटस्फोटाचा निर्णय ऐकून सगळे थक्क झाले होते. एक वेळ अशी होती, जेव्हा अमृता सिंग आणि सैफ अली खान या दोघांना बॉलिवूडमधील परफेक्ट कपल म्हटलं जायचं. या दोघांनी १९९१ मध्ये लग्न केले होते. तर लग्नाच्या तेरा वर्षानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले.
एका मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला होता की, अमृता सिंगसोबत घटस्फोट हा सगळ्यात वाईट प्रसंग होता. कारण त्या घटनेचा परिणाम त्यांच्या मुलांवर होत होता. ज्यावेळी दोघांचा घटस्फोट झाला तेव्हा सारा अली खान (Sara Ali Khan) केवळ दहा वर्षाची होती, तर इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) केवळ चार वर्षाचा होता.
सारा अली खानने एका मुलाखतीत आपल्या आईवडिलांच्या घटस्फोट सांगितले होते की, “साधी गोष्ट आहे, तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. तुम्ही अशा घरात राहा जिथे कोणीच खुश नाही. किंवा वेगळे राहा जिथे तुम्ही एकट्याला आनंदी मानता. अशा वेळी जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता तेव्हा तुम्ही खूप आनंदित असता. त्यामुळे तुम्हाला जो योग्य निर्णय वाटतोय तो घ्या.”
सारा अली खान पुढे म्हणाली, “मला वाटत नव्हतं ते दोघे एकमेकांबरोबर आनंदी राहिले असते. वेगळे होणे हा दोघांसाठीही योग्य निर्णय होता.” सारा आपल्या आईच्या खूप जवळ आहे. २०१२ मध्ये सैफ अली खानने करीना कपूरसोबत लग्न केले. करीना कपूर साराला आपली मैत्रीण मानते. सारा आणि इब्राहिम दोघांचेही करीनासोबत खूप चांगलं बॉन्डिंग आहे.
हेही वाचा :