Thursday, March 28, 2024

लईच भारी! चित्रपट निर्मात्याने टेनिस प्रीमियर लीगमध्ये खरेदी केली ‘पुणे जग्वार्स’ टीम

पुणे। युवा उद्योजक आणि चित्रपट निर्माते पुनीत बालन विविध खेळाडूंना सातत्याने मदत करतात. त्याचबरोबर ते खेळांना प्रोत्साहन देत असतात. टेनिस प्रीमियर लीग (टीपीएल) या मानाच्या टेनिस स्पर्धेचा तिसरा हंगाम लवकरच होणार असून त्यामध्ये पुनीत बालन यांनी ‘पुणे जग्वार्स’ ही टीम खरेदी केली आहे.

टेनिस प्रीमियर लीग (टीपीएल) ची सुरुवात 2018 साली झाली आहे. 2018 आणि 2019 च्या यशस्वी आयोजनानंतर आगामी तिसरा हंगाम लवकरच होणार आहे. दिग्गज खेळाडु आणि अनेक बॉलीवूड सेलेब्रिटींचा या स्पर्धेच्या आयोजनात, टिम व्यवस्थापनात सहभाग आहे. सोनी ईएसपीएन या स्पोर्ट्स चॅनलवर प्रसारित झालेल्या या स्पर्धेत 2019 साली पुणे वॉरिअर्स विजेते ठरले होते. दरम्यान ‘पुणे वॉरिअर्स’ या टीमचे नामकरण नुकतेच ‘पुणे जग्वार्स’ असे करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुणे जग्वार्ससह मुंबई लियॉन आर्मी, फाईन कॅब हैद्राबाद स्ट्रायकर्स, चेन्नई स्टॅलियन्स, पंजाब बुल्स, गुजरात पँथर्स, दिल्ली बेंनी ब्रिगेड, बेंगळुरू स्पार्टन्स या आठ संघाचा समावेश होता. विविध गटांसह व्हीलचेयर प्लेयर्स टीम हे टीपीएलचे वैशिष्ट्य आहे. आगामी सीझनसाठी ‘पुणे जग्वार्स’ ही टिम युवा उद्योजक पुनीत बालन यांनी खरेदी केली आहे, या टीमच्या को – ओनर बॉलीवूड अभिनेत्री, लेखिका, आणि कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या सोनाली बेंद्रे – बहल आहेत.

टीपीएल मधील सहभागाबद्दल बोलताना पुनीत बालन म्हणाले, “क्रिकेट सोबतच अन्य खेळांनाही प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. ‘पुणे जग्वार्स’ च्या माध्यमातून अनेक टेनिसपटूंना व्यावसायिक व्यासपीठ मिळेल तसेच या लीग मधून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू घडतील असा आम्हाला विश्वास वाटतो, तसेच टेनिसला प्रोत्साहन देणे आणि टेनिसचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आमचा मानस आहे.”

या विषयी बोलताना ‘पुणे जग्वार्स’च्या को – ओनर सोनाली बेंद्रे – बहल आणि टीपीएलचे संयोजक कुणाल ठाकूर व मृणाल जैन म्हणाले, 2018 आणि 2019 च्या यशस्वी आयोजनानंतर तिसर्‍या सीझन बद्दल चाहत्यांच्या मनात मोठी उत्सुकता आहे. यंदाच्या सीझन मध्ये पुनीत बालन यांचे ‘पुणे जग्वार्स’च्या माध्यमातून स्पर्धेत आगमन झाले याचा आम्हाला आनंद वाटतो. मागील दोन सीझन प्रमाणेच यंदाची स्पर्धाही मोठ्या उत्साहात लवकरच सुरू होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘हे’ कलाकार उतरणार क्रिकेटच्या रणांगणात, माजी भारतीय खेळाडू युसुफ पठाणच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण

हे देखील वाचा