Thursday, September 28, 2023

‘पुरुषांचं हे भारीपण कधी कोणासमोर येत नाही’, अशोक सराफ यांनी व्यक्त केली खंत

सध्या बॉक्स ऑफिसवर एकाच सिनेमाचा बोलबाला आहे. मराठी चित्रपट ‘बाईपण भारी देवा‘ने बाॅक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी विषेश महिला वर्गाने मोठ्या संखेने हजेरी लावली आहे. या सिनेमात 5 बहिणीची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. हा चित्रपट नुकताच प्रसिद्ध अभिनेत अशोक सराफ यांनी बघितला आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ती चागंलीच चर्चेत आली आहे.

अशोक सराफ (Ashok Saraf ) म्हणाले की,”बाईपण काय भारी आहे हे दाखवायला लोक पुढे येतील, पण पुरुषांचं भारीपण कोणी दाखवणार नाही. पुरुषांचं भारी पण हे नकळत ठरलं जातं आणि ते फक्त जाणवून घेण्यापर्यंतच असतं. त्याचा कुणी गवगवा करत नाही कधी.” असे म्हणत त्यांनी एक मुद्दा समोर आणला आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, बायका आपल्या मनातल्या भावभावना, दुःख मैत्रिणींना किंवा नवऱ्याला सांगत असतात. पण पुरुष मंडळी यावर एक शब्द देखील कोणाला सांगत नाहीत. आपली दुःख, त्रास, आर्थिक संकटं ते कधीच कोणासमोर सांगत नाहीत. त्यावर ते कधीच मनमोकळेपणाने गप्पा मारत नाहीत. ते प्रत्येक त्रासाला गप्प बसून सामोरे जातात.

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओनं केली आहे. केदार शिंदेचा तुफान गाजणारा ‘बाईपण भारी देवा’ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका आहेत. यासोबतच सिनेमात अनेक कलाकार विविध छोट्या छोट्या सरप्राईज भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 30 जून, 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. (Expressed regret to Ashok Saraf about the movie ‘Baipan Bhari Deva’)

अधिक वाचा- 
रिलवरून ट्रोल करू पाहणाऱ्या नेटकाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांचे सणसणीत उत्तर, कमेंट करत म्हणाल्या, “कोणी विचारलाय सल्ला?…”
बलदंड शरीर, हातात फावडं; ‘हा’ मराठी अभिनेता आहे तरी कोण? ‘थकाबाई’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

हे देखील वाचा