Monday, October 2, 2023

‘बाईपण भारी देवा’ची गरुडझेप! अवघ्या 24 दिवसांत कमावले ‘एवढे’ कोटी, आकडा वाचाच

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा‘ चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास 24 दिवस झाले आहेत. मात्र, तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही थिएटर्समध्ये महिलांचे ग्रूप्स मोठ्या संख्येने एकत्रित चित्रपट पाहण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांमध्ये ‘बाईपण भारी देवा’ विषयी उत्सुकता पाहायला मिळाली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाल करेल अशी चर्चाही रंगली होती आणि याच अपेक्षेवर खरं उतरत या चित्रपटाने केवळ 24 दिवसांत 65.61 कोटींची कमाई केली आहे. हे चित्र पाहता हया चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला आलेली मरगळ झटकून फेकून दिलीय अशी चर्चा रंगलेली दिसत आहे. नुकतीच या चित्रपटाची सक्सेस पार्टी मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडली. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती.

‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 12.50 कोटींचा गल्ला जमवला होता, दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आपली हुकमत कायम ठेवत 24.85 कोटींची कमाई केली, त्याच प्रमाणे तिसऱ्या तिसऱ्या आठवड्यात ही बाजी मारत 21.24 कोटींची कमाई केली आहे. आणि आतापर्यंत फक्त 24 दिवसांत या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर एकूण 65.61 कोटींचा पल्ला गाठला आहे. प्रदर्शनानंतर ‘बाईपण भारी देवा’नं नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत आणि सिनेमागृहात ओसांडून वाहणारी प्रेक्षकांची गर्दी बघता ही आकडेवारी अजून मोठी झेप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला ‘बाईपण भारी देवा’ची संपूर्ण कलाकरांची टीम, तसंच दिग्दर्शक केदार शिंदे, निर्माती माधुरी भोसले, सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे अशी संपूर्ण टीम उपस्थित होती. तसंच या सक्सेस पार्टीत अभिनेत्री सुकन्या मोने यांचे पती अभिनेते संजय मोने, वंदना गुप्ते यांचे पती शिरीष गुप्ते, दीपा परब हिचे पती अभिनेता अंकुश चौधरी, रोहिणी हट्टंगडी यांचा मुलगा असिम आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यांची विशेष उपस्थिती सर्वांनाच सरप्राईज देणारी ठरली.

“आपल्या चित्रपटाच्या यशाचं सगळं क्रेडिट त्यातील अभिनेत्री आणि त्यासाठी सर्वतोपरे मेहनत घेणाऱ्या माझ्या टीमचं आहे”, अशी भावना दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी व्यक्त केली. चित्रपटाची लेखिका वैशाली नायक हिचे विशेष आभार मानत केदार शिंदे यांनी तिच्या लिखाणाचं कौतुकही केलं. त्याचबरोबर या प्रसंगी सर्व तंत्रज्ञ, गायक, संगीत दिग्दर्शक यासगळ्यांची विशेष ओळख करून देण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे. आणि आजही चित्रपटाचे कलाकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी थिएटर्समध्ये जाऊन प्रेक्षकांची भेट घेताना दिसत आहेत. (marathi movie Baipan Bhari Deva collected 65.61 crores in 24 days)

महत्त्वाच्या बातम्या-
“आम्ही सुपरस्टार झालो…” बाईपण भारी देवा सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून वंदना गुप्तेंनी व्यक्त केल्या भावना
‘टॅलेंटमुळे काम मिळालंय, सोशल मीडिया…’, अभिनय करिअरच्या संघर्षावर ‘आनंदी’चे परखड मत

हे देखील वाचा