Tuesday, September 26, 2023

बलदंड शरीर, हातात फावडं; ‘हा’ मराठी अभिनेता आहे तरी कोण? ‘थकाबाई’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

एक खतरनाक रहस्य सर्वांसमोर उघड करण्यासाठी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रहस्यमयी आणि गूढ चित्रपटांना मराठी रसिकप्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. असाच एक रहस्यमयी चित्रपट नवोदित दिग्दर्शक युवीन कापसे स घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘थकाबाई’ असं आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे.

बांद्रा येथील शॉ किया शोरूममध्ये हा सोहळा पार पडला आहे. नावातच रहस्य असलेल्या चित्रपटात शुभंकर तावडे आणि हेमल इंगळे मुख्य भूमिकेत दिसतील तर अभिनेते मीर सरवर एका विशेष भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. ‘थकाबाई’ (‘Thakabai’) चित्रपटाचे पोस्टर त्याच्या विषयासारखेच रहस्यमयी आहे.

त्या पोस्टवर शुभंकर तावडेचा एक भयावह लूक त्याच्या उग्र हावभावांसह या पोस्टरवर दिसतोय. तर हेमल इंगळे रहस्याचा शोध घेणाऱ्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या हातात कंदिल असून ती जंगलात काहीतरी शोधतेय अशी मुद्रा तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ‘सत्य की असत्य थकाबाई: जाणे रहस्य’ या नावातच असलेल्या टॅगलाईनमुळे नक्की चित्रपटात काय असेल? थकाबाई म्हणजे नक्की कोण? आणि तिचं काय रहस्य आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

हे पोस्टर लाॅंचिंगच्या कार्यक्रमावेळी सुनील जैन प्रस्तुत आणि दीवा सिंह, अजय गेही, दानिश अल्फाज, जयकुमार नायर, आमीर सिकंदर, मुदसिर भट, प्रतिक्षा मिश्रा, मकरंद उपाध्याय, नामदेव कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. तर युवीन कापसे निर्मित ‘थकाबाई’ चित्रपटाच्या पोस्टर लॉंच करण्याच आले आहे. या पोस्टरची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. (Poster release of Marathi movie ‘Thakabai’)

अधिक वाचा- 
“लाज आणणारे प्रश्न चार चौघात विचारून …” परखड मतं मांडणाऱ्या हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट व्हायरल
उर्वशी रौतेलाचे ‘ते’ ट्विट व्हायरल; नेटकरी म्हणाले,’थोडं भान ठेव, दारू पिऊन…

हे देखील वाचा