Friday, October 17, 2025
Home मराठी अभिनंदन! प्रवीण तरडे यांना ‘फकिरा पुरस्कार’ जाहीर, होतोय कौतुकाचा वर्षाव

अभिनंदन! प्रवीण तरडे यांना ‘फकिरा पुरस्कार’ जाहीर, होतोय कौतुकाचा वर्षाव

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तेल वात समिती व पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंतीनिमित्ताने “फकीरा पुरस्कार” वितरण समारंभ करण्यात येत आहे. हा कार्यक्रम 27 ऑगस्ट रोजी सायं. 5 वाजता सावित्रीबाई फुले स्मारक, गंज पेठ, लोहिया नगर, पुणे या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.

याप्रसंगी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी सिने अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे ( Praveen Tarde) यांना ‘फकीरा पुरस्कार’ (Fakira Award) , यशवंत नडगम यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार, प्रतिभा नारी परिवर्तन संस्था यांना सामाजिक कार्याबद्दल गौरव समाज भूषण पुरस्कार पुण्याचे पालकमंत्री तसेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश दादा बागवे मा. गृहमंत्री हे असणार असून या कार्यक्रमाला आमदार सुनील कांबळे, संजय काकडे, दिलीप कांबळे, माधुरी मिसाळ भगवानराव वैराट, मुरलीधर मोहोळ, पुणे शहर जिल्हा मातंग समाजचे सचिव-दयानंद अडागळे व स्वागताध्यक्ष- पंढरीनाथ अढाळगे असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक सुखदेव अडागळे प्रमुख आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तेल वात समिती पुणे यांनी दिली. सदरील कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीजास्त पुणेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Fakira Award announced to Praveen Tarde)

अधिक वाचा-
वयाने 13 वर्ष लहान जैदसह लग्नापासून ते अज्ञाताने कानशिलात लगावण्यापर्यंत, ‘या’ वादांमध्ये अडकलेली गौहर खान
काय सांगता! अज्ञात व्यक्तीने भडकावली होती गौहर खानच्या श्रीमुखात, वाचा रंजक किस्सा

हे देखील वाचा