Thursday, March 30, 2023

काय सांगता! अज्ञात व्यक्तीने भडकावली होती गौहर खानच्या श्रीमुखात, वाचा रंजक किस्सा

लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस सीझन ७ (Bigg Boss 7) ची विजेती मॉडेल-अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) आज म्हणजे २३ ऑगस्ट रोजी आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्रीने केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर मोठ्या पडद्यावरही धमाल केली आहे. झलक दिखला जा सारख्या रिअ‍ॅलिटी शोचा भाग देखील बनली आहे. गौहर खान इशकजादे सारख्या चित्रपटात दिसली आहे आणि तांडव वेब सीरिजमध्ये अभिनेत्रीची वेगळी शैली पाहायला मिळाली आहे. गौहरची कारकीर्द विविधतेने भरलेली आहे. मात्र, इंडस्ट्रीत स्थान निर्माण करणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात गौहरने अशा अडचणींचा सामना केला आहे. परंतु एका लाईव्ह शोमध्ये मारलेल्या त्या चपराखेमुळे तिच्या करिअरला उतरती कळा लागली. पाहूया काय होता तो किस्सा…

काही वर्षांपूर्वी एका फॅशन शोमध्ये गौहरला प्रमुख पाहुणी म्हणून बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी स्टेजवर रँमवॉक करताना एका व्यक्तीने अडवलं अन् शिव्या घालत तिच्या थोबाडीत मारली. हा प्रकार पाहून सर्वजण चकित झाले. त्यानंतर गौहरनं एकच गोंधळ घातला. तेथील उपस्थित गार्ड्सने त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं. या प्रकारामुळे गौहर रातोरात प्रसिद्ध झाली. परंतु हा प्रकार केवळ पब्लिसिटी स्टंटसाठी करण्यात आला होता असं पुढे सिद्ध झालं.

थोबाडीत मारलेल्या व्यक्तीनं गौहरविरोधात आरोप केले. तिनेच त्याला मारण्यासाठी पैसे दिले होते. शिवाय त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोडवलं देखील जाईल आश्वासन मिळालं होतं. परंतु या प्रकरणानंतर गौहरनं असं काही केलं नाही. परिणामी संतापलेल्या त्या व्यक्तीने माध्यमांसमोर येत गौरहविरोधात आरोप केले. परिणामी प्रकरणामुळे तिच्यावर जोरदार टीका झाली. अन् रातोरात मिळालेली प्रसिद्ध लयास गेली. त्यावेळी अनेक प्रोजेक्टमधून तिची हकालपट्टी करण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा – KK Birth Anniversary | अगदी साधेसरळ होते गायकाचे आयुष्य, बालमैत्रिणीशी केला होता विवाह
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा लूक पाहून चाहते हैराण, ओळखणेही झाले कठीण
वयाने १२ वर्षे लहान अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती सोनाली फोगाट, वाचा किस्सा

हे देखील वाचा