बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याची आणि प्रतिभेची जादू सर्वांवर टाकत आहे. मुख्य भूमिकेत दिसणाऱ्याच सर्व अभिनेत्री लोकप्रिय असतात किंवा त्यांनाच जास्त मीडियामध्ये स्थान मिळते असे नाही. याव्यतिरिक्त देखील अनेक अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी छोट्या मात्र लक्षात राहणाऱ्या भूमिका, डान्स नंबर्स करत मोठी ओळख मिळवली. अशीच एक अभिनेत्री म्हणजे गौहर खान. गौहरने तिच्या छोट्या मात्र तरीही लक्षात राहणाऱ्या भूमिका आणि डान्स नंबर्सने सर्वांची मने जिंकली. आज गौहर तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.
गौहरचा जन्म 23 ऑगस्ट 1983महाराष्ट्रातल्या पुण्यात एका मुस्लिम परिवारात झाला. गौहरने तिचे करियर मॉडेल म्हणून सुरु केले. मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये गौहरचे नाव खूप मोठे आणि प्रसिद्ध आहे. गौहरने तिच्या मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात पदार्पण केले आणि यश मिळवले. तिने मनीष मल्होत्रा, नीता लुल्ला, रितु कुमार आदी अनेक मोठ्या डिझायनरसाठी रॅम्प वॉक केला आहे. मॉडेलिंग करत असताना तिने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले. मात्र तिला अपेक्षित यश मिळाले नाही. गौहरची अजून एक ओळख म्हणजे तिचा स्पष्टवक्ता आणि बिनधास्त स्वभाव. (gauhar khan birthday)
गौहरने 2009 साली आलेल्या रणबीर कपूरच्या ‘रॉकेट सिंह: द सेल्समॅन’ सिनेमातून चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले. मात्र तिला तिच्या अभिनयापेक्षा तिच्या जबरदस्त डान्ससाठी जास्त ओळखले जाऊ लागले. तिने ‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’ सिनेमात ‘परदा परदा’ या गाण्यावर धमाकेदार डान्स केला. हे गाणे आणि तिचा डान्स खूपच हिट झाला. त्यानंतर तिला अभिनयापेक्षा डान्ससाठी जास्त ऑफर आल्या. अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्या ‘इश्कजादे’ सिनेमात भूमिका मिळाली. तिची भूमिका छोटी असली तरी लक्षवेधी होती. सोबतच या सिनेमातील तिची ‘छल्ला छल्ला’, ‘छोकरा जवान रे’ ही दोन गाणी तुफान गाजली.
गौहरने टेलिव्हिजन इंडस्ट्रीवरील सर्वात विवादित आणि लोकप्रिय 2013 साली बिग बॉस 7मध्ये भाग घेतला आणि तिचे संपूर्ण जीवनच बदलले. या शोमध्ये येणे आणि टिकणे तिच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. यशोमध्ये तिला सर्वत नखरेबाज स्पर्धक म्हणून सांगितले जायचे. या शोदरम्यान गौहरला सलमान खानने अनेकदा खूप सुनावले देखील होते. मात्र तिने अतिशय चांगल्या पद्धतीने हा खेळ खेळाला आणि ती बिग बॉसची विनर झाली.
या शो दरम्यान बिग बॉसच्या घरात ती आणि अभिनेता कुशल टंडन यांच्या जवळीक वाढली आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मात्र घराबाहेर पडल्यावर त्यांचे नाते तुटले. मात्र या शोने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. गौहर अनेक विवादांमध्ये देखील अडकली आहे. एका सिंगिंग शोला होस्ट करताना प्रेक्षकांमधील एकाने उठत थेट गौहरच्या कानाखाली मारली होती. ज्याने तिला मारले त्याने सांगितले की, मुस्लिम असूनही गौहर खूप छोटे कपडे घालत असल्याने त्याने तिला मारले. पुढे गौहरने प्रेस कॉन्फरन्स घेत ज्याने तिला मारले त्याबद्दल बोलताना सांगितले होते की, “असे माणसं समाजात राहणे म्हणजे इतर मुलींसाठी धोका आहे.”
गौहरने 25 डिसेंबर 2020 रोजी संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांचा मुलगा कोरिओग्राफर जैद दरबारशी लग्न केले. जैद आणि गौहरमध्ये 12/13 वर्षांचे अंतर आहे. त्यावेळी गौहर 37 वर्षींंची होती तर जैद 25 वर्षांचा होता. सोशल मीडियावर नेहमी त्यांचे फोटो व्हायरल होत असतात.
हेही नक्की वाचा-
–काय सांगता! अज्ञात व्यक्तीने भडकावली होती गौहर खानच्या श्रीमुखात, वाचा रंजक किस्सा
–चित्रपटात येण्यापूर्वी हाॅटेलमध्ये काम करायची वाणी कपूर; मात्र सुशांतसोबत काम करून बदलले अभिनेत्रीचे आयुष्य