Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड ‘चंद्रावर भारताचं पहिलं पाऊल पडणार…’; ‘चांद्रयान 3’साठी कलाकारांनी दिल्या खास शुभेच्छा

‘चंद्रावर भारताचं पहिलं पाऊल पडणार…’; ‘चांद्रयान 3’साठी कलाकारांनी दिल्या खास शुभेच्छा

सगळ्या भारतीयांच लक्ष आज ‘चांद्रयान-3‘ कडे लागले आहे. ‘चांद्रयान-3‘ 23 ऑगस्टला म्हणजेच आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर ही मोहीम यशस्वी होईल. त्यावेळी चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे. भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवाची असलेली ‘चांद्रयान-3‘ मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आली असुन काय पुढे काय होणार याकडे सर्वांटचे लक्ष वेधले आहे. यावर अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनी इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि बेबो म्हणून ओळखली जाणारी करिना कपूरने ‘चांद्रयान-3’वर (Chandrayaan 3) भाष्य केले आहे. ती म्हणाली की, ‘चांद्रयान-3’ या मोहिमेचं मी मनापासून समर्थन करते. हे ‘चांद्रयान-3’चं लॅण्डिंग मी माझ्या मुलांसोबत बघणार आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. प्रत्येक भारतीय सध्या ‘चांद्रयान-3’ लॅण्डिंगीची आतुरतेने वाट पाहत आहे.”

प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांनी देखील एक व्हिडिओ सोशर मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकांउटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, “मला पूर्ण विश्वास आहे की #Chandrayaan3 लवकरच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. मला आपल्या भारतातील महान शास्त्रज्ञांचा अभिमान आहे, ज्यांच्या मेहनतीमुळे भारत अवकाश क्षेत्रात इतिहास घडवणार आहे. मला आनंद होत आहे की, आदरणीय पंतप्रधान श्री.
नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत नव्या वाटचालीकडे प्रवेश करत आहे. त्यामुळे ‘चांद्रयान-3’ यशस्वी व्हावं यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत ”

 यावर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Prayer For Chandrayaan 3) बोलताना म्हणाले की,”चंद्रावर भारताचं पहिलं पाऊल पडणार आहे. भारत इतिहास रचणार आहे”. ‘चांद्रयान-3’ लॅण्ड होण्यासाठी आता काही तासच बाकी राहिले आहेत. (Famous actor Amitabh Bachchan wished for Chandrayaan 3)

अधिक वाचा- 
वयाच्या 12व्या वर्षीच सायरा यांना करायचे होते 22 वर्ष मोठ्या अभिनेत्याशी लग्न; रंजक आहे त्यांची ‘लव्हस्टोरी’
KK Birth Anniversary | अगदी साधेसरळ होते गायकाचे आयुष्य, बालमैत्रिणीशी केला होता विवाह

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा