Thursday, September 28, 2023

चांद्रयान-3 मिशनबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याने अभिनेते अडचणीत, हिंदू संघटनांनी पोलिसात तक्रार केली दाखल

अभिनयाव्यतिरिक्त नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असणारे अभिनेते म्हणजे प्रकाश राज होय. प्रकाश राज हे यापूर्वी त्याच्या अनेक वक्तव्यांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावरही आले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर हीच वेळ आली आहे. प्रकाश राज चांद्रयान- 3 मिशनबाबत वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे अडचणीत आले आहेत. प्रकाश राज यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू संघटनांच्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध बागलकोट जिल्ह्याच्या बनहट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत कारवाईची मागणीही केली आहे.

चांद्रयान- 3ची उडवलेली थट्टा
अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी मागील काही दिवसांपूर्वी ट्विटर म्हणजे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वादग्रस्त पोस्ट करत इस्रोच्या चांद्रयान- 3 (Chandrayaan- 3) मिशनची थट्टा उडवली होती.

अभिनेत्याने चांद्रयान- 3ची थट्टा उजवत एक कार्टून पोस्ट केले होते. या पोस्टमध्ये लुंगी परिधान केलेला एक व्यक्ती एका कपातून दुसऱ्या कपात चहा टाकत असल्याचे दिसत आहे. या कार्टूनसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “चांद्रयान- 3च्या विक्रम लँडरमधून चंद्राहून येणारा फोटो.”

मात्र, प्रकाश राज यांच्या कार्टूनमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीबाबत काहीही बोलले जाऊ शकत नाही. मात्र, लोकांनी त्यांच्या या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे.

नेटकऱ्यांनी केले ट्रोल
एकाने लिहिले की, “प्रकाशजी, इस्रोच्या या कामगिरीपासून राजकीय द्वेष दूर ठेवा. चांद्रयान मिशन इस्रोचे आहे, भाजपचे नाही. जर हे यशस्वी ठरले, तर हे भारताचे यश असेल, कोणत्याही पक्षासाठी नाही.” आणखी एकाने लिहिले की, “प्रकाश राज त्या कामगिरीची थट्टा उडवत आहेत, ज्याला संपूर्ण जग मैलाचा दगड मानत आहे. तुम्ही पातळी सोडली आहे.”

प्रकाश राज यांचे स्पष्टीकरण
यानंतर प्रकाश राज यांनी आणखी एक ट्वीट करत स्पष्ट केले की, त्यांची पोस्ट फक्त मजेसाठी होती. त्यांनी लिहिले की, “द्वेष फक्त द्वेष पाहतात. मी आमच्या केरळ चहावाल्याचा जल्लोष करताना आर्मस्ट्राँगच्या काळातील एका विनोदाचा उल्लेख करत होतो. ट्रोलर्सनी कोणता चहावाला पाहिला? जर तुम्हाला विनोद कळत नसेल, तर विनोद तुमच्यावर आहे. मोठे व्हा. फक्त विचारतोय.”

कधी लँड होणार चांद्रयान- 3?
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या (ISRO) मते, चांद्रयान- 3 23 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार, जवळपास 18.04 वाजता चंद्रावर उतरणार आहे. याची सर्व भारतीय आतुरतेने वाट पाहत आहेत. (veteran actor prakash raj trapped for wrong comment on chandrayaan 3 mission hindu organizations lodge police complaint read)

महत्त्वाच्या बातम्या-
एकत्र दिसल्या आमिरच्या दोन्ही एक्स पत्नी; नेटकरीही म्हणाले, ‘आमिरशी घटस्फोट घेतल्यानंतर दोघी…’
नॉर्मल वाटलो का! भोजपुरी सुपरस्टारच्या ताफ्यात आलिशान कारची एन्ट्री, टॉप स्पीड 240 किमी; किंमत…
‘राखी सावंत कधीच बनू शकत नाही आई’, आदिलच्या दाव्याची अभिनेत्रीने पुराव्यासकट खोलली पोल; वाचा

हे देखील वाचा