Saturday, September 30, 2023

नाद करा पण आमचा कुठं! शाहरुखच्या ‘जवान’ला टक्कर देत ‘ड्रीम गर्ल 2’ने केली तब्बल 100 कोटींची कमाई

प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आणि त्याने प्रचंड मोठी खळबळ उडवून दिली. सनी देओलचा ‘गदर 2’ आणि ‘ड्रीम गर्ल2’ चित्रपट एकाच दिवशी दिवशी 11 सप्टेंबरला रिलीज झाले. त्यामुळे या दोन चित्रपटांची बॉक्स ऑफिस वर टक्कर झाली. यादरम्यान आता कोणत्या चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी आयुष्यमान खुरानाच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

आयुष्मान खुराणचा ‘ड्रीम गर्ल2’ (Dream Girl 2)हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर फ्लॉप ठरतो की काय अशी चर्चा रंगली होती. पण सध्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ‘ड्रीम गर्ल2’ चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना सोबत प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसत आहे. नुकतेच ‘ड्रीम गर्ल2’ 19 व्या दिवशीचे कलेक्शन समोर आले आहे. आयुष्मान खुराणचा 14 सप्टेंबरला वाढदिवस साजरा करणार आहे. पण त्या अगोदरच ‘ड्रीम गर्ल2’ ने त्याला मोठे बक्षीस दिले आहे.

‘ड्रीम गर्ल2’ने 18व्या दिवशी तब्बल 60 लाख रुपये यांचा गल्ला जमवला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, या चित्रपटाने एकूण कलेक्शन 100.56 कोटी केले आहे. शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून अनेक चित्रपटांवर त्याचा परिणाम झालेला दिसून आला. पण शाहरुखच्या जवानाला टक्कर देत ‘ड्रीम गर्ल2’ चित्रपटाने मोठी कामगिरी केली आहे.

‘ड्रीम गर्ल2’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, ‘ड्रीम गर्ल2’चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. परेश रावल, राजपाल यादव , मनोज सिंग, अभिषेक बॅनर्जी आणि अन्न कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. (Famous actor Ayushmann Khurrana film Dream Girl 2 grossed Rs 100 crores at the box office.)

अधिक वाचा-
पडदा पडला! प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते ‘बिरबल’ यांचं दुःखद निधन; 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आता ‘गदर 2’ शाहरुख खानच्या ‘जवान’वर पडणार भारी! 33व्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

हे देखील वाचा