Saturday, September 30, 2023

आता ‘गदर 2’ शाहरुख खानच्या ‘जवान’वर पडणार भारी! 33व्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

ऑगस्ट महिन्यात एकवर एक धडाडीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. या चित्रपटांनी प्रत्येक सिनेमागृह दणाणून सोडली आहेत. 11 ऑगस्टला प्रसिद्ध अभिनेता सनी देओल स्टारर ‘गदर 2′ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 24 दिवसात या चित्रपटाने 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ‘गदर 2’ने शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि प्रभासच्या ‘बाहुबली 2′ या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले.

तब्बल 22 वर्षानंतर सनी देओल (Sunny Deol ) आणि अमिषा पटेलची जोडी पुन्हा एकत्र प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळाली. ‘गदर 2’ने (Ghadar 2) बॉक्स ऑफिस वर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाने अक्षय कुमारच्या ‘ओएमजी 2’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘बाहुबली 2’ आणि ‘केजीएफ’ यासारख्या चित्रपटांना मागे टाकले. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटून गेला आहे. मात्र, आता चित्रपटाचे कलेक्शन हळूहळू कमी होत चालले आहे.

शाहरुख खानचा ‘जवान’ (Jawan) चित्रपट प्रदर्शित झाला आणि सनी देओलचा ‘गदर 2′ त्याच्या वादळात उडून गेला. शाहरुख खानच्या चित्रपटाचा परिणाम केवळ ‘गदर2’वरच नव्हे, तर ड्रीम गर्ल टू या चित्रपटावर ही मोठा झाल्याचे दिसून येत. सनी देवल अमिषा पटेल स्टार या चित्रपटाने 24 दिवसात जगभरात 600 कोटींचा टप्पा ओलांडला होता. पण आता ‘गदर 2’ला 700 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे.

या चित्रपटाने सोमवारी जगभरात एकूण 672 कोटींचा व्यवसाय केला आहे. 33 दिवसात या चित्रपटाने 674 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. सनी देओलच्या या चित्रपटाने मंगळवारी जगभरात सुमारे 2 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. परदेशात हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटली, मलेशिया आणि न्यूझीलंडसह अनेक ठिकाणी प्रदर्शित झाला आहे. (Sunny Deol Ghadar 2 has grossed a lot, surpassing Shahrukh Khan Jawan)

अधिक वाचा-
निखळ सौदर्यांची खाण असलेल्या प्राजक्ताचे आंबा कलरच्या साडीत खुललं रूप, पाहा फोटो
पडदा पडला! प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते ‘बिरबल’ यांचं दुःखद निधन; 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा