Friday, July 5, 2024

India VS Bharat; अभिताभ बच्चन यांचे ट्विट व्हायरल; म्हणाले, ‘भारत माता की जय…’

देशाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. G20 शिखर परिषदेच्या डिनरच्या निमंत्रण पत्रावर भारताचे राष्ट्रपती असे लिहिले आहे, तर ते इंडियाचे राष्ट्रपती असावेत, असा आरोप काँग्रेसने केल्याने वाद सुरू झाला. त्यामुळे मोदी सरकार देशाचे नाव बदलणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर विरोधक हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे राजकारण वर्तुळात आणि सोशल मीडियार जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान बाॅलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले आहे. जे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन (amitabh bachchan)यांनी लिहिले की, “भारत माता की जय.” संविधानमध्ये इंडियाचे नाव बदलून भारत करण्याची चर्चा सुरू असतानाच हे ट्विट करण्यात आले आहे. इंडिया आणि भारत हे दोन शब्द देशाच्या राजकारणात आहेत. अशा प्रसंगी बिग बींचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. काही मिनिटांतच याला ट्विटला 1500 हून अधिक रिट्विट्स आले आहेत. तसेच अनेकांनी हे ट्विट लाईक केले आहे. अमिताभच्या या ट्विटवर ट्विटर युजर्स सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये इतर कशाचाही उल्लेख केला नसला तरी वापरकर्ते याचा थेट संबंध इंडिया आणि भारत या शब्दाबाबत सुरू असलेल्या राजकीय वादाशी जोडत आहे. विरोधी महाआघाडीचे नाव इंडिया ठेवल्यापासूनच वाद सुरू आहे. आता G20 च्या निमंत्रण पत्रात ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ लिहिलेले पत्र समोर आले आहे, ज्यावर विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ते शेवटचे ‘ ऊंचाई’ या चित्रपटात दिसले होते. याआधी, ते ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’ या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत गुडबायमध्ये दिसला होता. आगामी काळात अमिताभ अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ‘कल्की 2898 एडी’ सारख्या बिग बजेट चित्रपटांचाही समावेश आहे. यामध्ये प्रभास आणि दीपिका पदुकोणसोबत बिग बी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (Famous actors amitabh bachchan tweet bharat mata ki jai viral amid controversy over india vs bharar)

अधिक वाचा-
‘या’ दिवशी पार पडणार ‘फक्त मराठी सिने सन्मान 2023′ पुरस्कार सोहळा; पुरस्कारांची नामांकने जाहीर
दिग्दर्शकाने किस केल्याच्या ‘त्या’ व्हिडीओवर प्रियांकाच्या बहिणीने तोडले मौन; म्हणाली, ‘मुद्दाम…’

हे देखील वाचा