Sunday, December 3, 2023

‘भाऊ तुझ्यावर प्रेम आहे पण..’; अभिताभ बच्चन यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

बाॅलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अभिताभ बच्चन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असता. बच्चन कुटुंबातील अनेक सदस्य मनोरंजन विक्ष्वात सक्रिय आहेत. अभिताभ बच्चन यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चनने अलीकडेच आर बाल्की दिग्दर्शित ‘घूमर’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सैयामी खेरही दिसली.

आता अलीकडेच, सोशल मीडियावर एका चाहत्याने अभिषेकच्या अभिनयावर एक टिप्पणी केली, ज्याला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Abhithab Bachchan ) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामावर बनला आहे. अभिषेक आणि सैयामी यांनीही या चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयाची प्रशंसा केली आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाने चांगला प्रतिसाद दिला आहे. तर काही लोकांनी त्याच्यावर टिका केले आहे.

एका चाहत्याने ट्विट करताना लिहिले की, ‘मला नेहमीच अभिषेक बच्चनबद्दल वाईट वाटते, त्याला नेहमीच कमी लेखले जाते. मात्र, त्याने नेहमीच आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. ‘युवा’, ‘गुरू’, ‘धूम’, ‘कभी अलविदा ना कहना’, दोस्ताना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने आपले सर्वोत्कृष्ट दिले आहे. यासह तो मनमर्जियां, बॉब बिस्वास, लुडो, दासवी आणि आता घूमर यांसारख्या चित्रपटांमधून उदयास आला आहे.”

 चाहत्याच्या या कमेंटला अभिताभ बच्चन यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “दु:खी होऊ नका, आनंदी राहा, सत्य हे आहे की तो प्रत्येक प्रयत्नात पुढे आहे आणि उत्कृष्ट आहे.” त्यांच्या या उत्तराने चाहत्यांचे मन जिंकले आहे. यासोबतच बिग बींनी अभिषेक बच्चनच्या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप शेअर केलेल्या आणखी एका चाहत्यालाही उत्तर दिले. या चाहत्याच्या व्हिडिओला उत्तर देताना बिग बींनी लिहिले की, ‘मी पूर्णपणे सहमत आहे, भाऊ तुझ्यावर प्रेम आहे.’ तर आर बाल्की दिग्दर्शित ‘घूमर’मध्ये अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर मुख्य भूमिकेत आहेत. (Abhithab Bachchan answer caught everyone attention)

 अधिक वाचा-
गणेशोत्सवाच्या ‘त्या’ नियमावर वैभव मांगलेंनी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले…
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी संशयास्पद मृत्यू, घरात सापडला मृतदेह

हे देखील वाचा