Friday, December 8, 2023

दिग्दर्शकाने किस केल्याच्या ‘त्या’ व्हिडीओवर प्रियांकाच्या बहिणीने तोडले मौन; म्हणाली, ‘मुद्दाम…’

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राला आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. तिने तिच्या अभिनेच्या आणि सौदर्याच्या जोरावर अमाप लोकप्रियता मिळवली आहे. प्रियांकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. प्रियांका सोशल मीडियावर देखील सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टवर चाहते भरभरून प्रेमाता वर्षाव करत असतात. सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण मन्नारा चोप्रा चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये साउथ डायरेक्टर एएस रवि कुमार चौधरी यांनी तिरागाबादरा सामी या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मन्नाराच्या गालावर चुंबन घेतले होते.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. मन्नाराचा (Mannara Chopra) तिरागाबादरा सामी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एएस रवि कुमार चौधरी यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. ज्यामध्ये रवीने मन्नाराला तिच्या परवानगीशिवाय किस केले होते. यानंतर मन्नारा खूपच अस्वस्थ झाली होती. मात्र त्यावेळी तिने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता मन्नाराने विमानतळावर पापाराझींशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी सवांद साधताना मन्नारा म्हणाली की, “सोशल मीडियावर ज्या काही बातम्या व्हायरल होत आहेत, त्याचा दिग्दर्शकांशी काहीही संबंध नाही. दिग्दर्शकाला माझं काम खूप आवडतं आणि ते मला वारंवार फोन करत राहतात. मी शूट केले नसते तरीही ते मला फोन करायचे. त्यांना माझे काम खुप आवडाते त्यामुळे ते मला खुप मिस करत होते.

मन्नारा चोप्रा पुढे बोलताना म्हणाली की, ‘ते जरा जास्तच उत्साहित झाले होते. मलाही आश्चर्य वाटले. या कारणास्तव त्याने हा सर्व प्रकार उत्साहाच्या भरात केला. अनेक वेळा लोक असे करतात आणि त्यांना याची जाणीवही नसते. त्याचा हेतू चुकीचा होता असे मला वाटत नाही. त्यामुळे त्या व्हायरल व्हिडीओमागे कसलंही तथ्य नाही, असं मुद्दाम करायचं असा हेतु आमच्या दिग्दर्शकाचाही नव्हता.’

 तिरागाबादरा सामी चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर, मन्नारासोबत नंदामुरी बालकृष्ण, गोपीचंद्र आणि साई धरम तेज हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, मकरंद देशपांडे या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मन्नाराने जिद या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Actress Priyanka Chopra cousin Mannara Chopra reacts to that viral video of director kissing her)

अधिक वाचा-
‘या’ दिवशी पार पडणार ‘फक्त मराठी सिने सन्मान 2023′ पुरस्कार सोहळा; पुरस्कारांची नामांकने जाहीर
अभिनेत्री नेहा शर्माच्या बोल्ड फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा; शाॅर्ट ड्रेसमध्ये दिल्या भन्नाट पोझ

हे देखील वाचा