Thursday, July 18, 2024

मोठी बातमी! अभिताभ बच्चन यांनी कापली नस, रूग्णालयात दाखल

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन हे सध्या टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोन बनेगा करोडपती 14’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहेत. याचे अनेक भाग नेहमी चर्चेत असतात. दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बीग बीकडेच आहे. या कार्यक्रमाच्या शुटींगच्या दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक घटना घडली आहे. शुटिंग सुरु असताना त्यांच्या पायाची नस कापली गेली आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नवीन भागाच्या शुटींंगदरम्यान त्यांच्यासोबत एक घटना घडली ज्यामध्ये त्यांच्या पायाची नस कापली होती. शुटिंग ठिकाणावरुन त्यांना लगेचच दवाखाण्यात पोहोचविण्यात आले. मात्र, त्यांची नस कापल्यामुळे जागेवरील व्यक्ती खूपच घाबरले होते. सगळीकडेच खळबळ माजली होती. मात्र , बच्चन यांनी एका ब्लॉगद्वारे आपल्या तब्येतीची बातमी देत चाहत्यांची काळजी मिटवली आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे माहिती दिली की, नस कापल्यामुळे पायाला टाके पडले आहेत. मात्र, आता ते पूर्णपणे ठिक आहेत.

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले की, “मेटलच्या एका धारदार वस्तुमुळे माझ्या पायाल कट लागला आणि रक्त येण्यास सुरुवात झाली, आणि मला लगेच दवाखान्यात पळविण्यात आले. यानंतर त्यांना पायामध्ये काही टाके घालण्यात आले. मी आता ठीक आहे. माला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी पायावर वजन देण्याचे सांगितले आहे, चलण्या फिरण्याला सक्त मनाई आहे.”

बच्चन यांनी पुढे सांगतले की, “केबीसी सेटवरील माझ्यावर पूर्ण लक्ष दिले जाते, मी जेवढा वेळ या सेटवर घालतो तेव्हा, माझे खूप ध्यान ठेवले जाते.” सांगायचे झाले तर, अमिताभ बच्चन यांनी नुतंच आपला 80वा वाढदिवस केबीसीच्या मंचावर साजरी केला होता. त्यांच्यासोबत अभिषेक बच्चन आणि जयाबच्चन यांनीही थेट केबीसीच्या मंचावर आगमन केले होते. तेव्हा अमिताभ बच्चन खूपच भावूक झाले होते, आणि तो भागही खूपच चर्चेत आला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अर्जुन कपूरने रोमांटिक फोटो शेअर करत मलायकाला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभच्छा..
प्रभासच्या वाढदिवसानिमित्त ओम राऊतने ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे नवे पोस्टर केलं शेअर

हे देखील वाचा