Thursday, June 13, 2024

‘या’ कारणामुळे गाण्यातच रमले किशोर कुमार; वाचा संगीताच्या बादशाहचा जीवनप्रवास

हिंदी सिनेसृष्टितील संगीतकार, पार्श्र्वगायक आणि सुप्रसिध्द अभिनेते किशोर कुमार यांनी त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी संगीत क्षेत्रात देखील खूप प्रसिद्धी मिळवली आहे. किशोर कुमार या जगात नसले तरी, त्यांची गाणी अजूनही सर्वप्रचलित आहेत. 4 ऑगस्ट 1929 या दिवशी ब्रिटिश इंडिया खंडवा सेंट्रल प्रोविंस (आताचे मध्य प्रदेश) या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. सिनेमामध्ये येण्यापूर्वी त्यांनी त्यांचे नाव बदलले. किशोर कुमार यांच्या जन्म दिनानिमित्त त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टींबाबात जाणुन घेऊया.

सुप्रसिध्द अभिनेते अशोक कुमार(Ashok Kumar) हे किशोर कुमार(Kishor Kumar) यांचे सख्खे भाऊ होते. त्यांची इच्छा होती की, किशोर कुमारने देखील अभिनय क्षेत्रात काम करण्यास प्राधान्य द्यावे, परंतू किशोर कुमार यांना अभिनयात रूची नव्हती. यामुळेच किशोर कुमार यांनी संगीतकार म्हणुन त्यांच्या जीवनाची सुरुवात केली. त्यांनी बॅांबे टॅाकीज या चित्रपटासाठी सर्वात प्रथम गाणं गायल होत. तर, 1946 च्या काळात त्यांनी शिकारी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात अशोक कुमार मुख्य भूमिकेत होते.

प्रसिध्द संगीतकार किशोर कुमार यांनी त्यांच्या संपुर्ण करीयरमध्ये एक ही गाण फ्रीमध्ये गायले नाही. ते कोणतही गाणं गाण्यासाठी पहिले एडवांस घेत असायचे. परंतु, हा नियम सगळ्यांंसाठी नव्हता, राजेश खन्ना आणि डैनी डेंजोंंगपा सोबत काम करीत असतांना ते या नियमाचे पालन करीत नव्हते. अमिताभ बच्चन यांच्यासाठी किशोर कुमार यांनी 131 गाणी गायली आहेत. ज्यामध्ये 115 गाणे सुपरहिट झाली होती. पण 1980च्या नंंतर त्यांची जोडी तुटली.

किशोर कुमार यांनी “ममता की छांव में” या त्यांच्या चित्रपटात बिग बी यांना पाहुण्यांची भूमिका करण्यासाठी विचारले होते. यावर अमिताभ यांनी नकार दिला होता. त्यामुळे किशोर कुमार नाराज झाले आणि त्यानंतर त्यांनी बिग बी यांच्यासाठी एकपण गाणं गायल नाही. किशोर कुमार यांनी आपल्या पूर्ण करियरमध्ये 16 हजार पेक्षा जास्त गाणी गायली परंतू, त्यांनी गायलेले शेवटचे गाणं आजही प्रसिध्द झाले नाही. 2012 साली ओशियन सिनेफैन ऑक्शनमध्ये किशोर कुमार यांच शेवटच गाणं ‘निलाम’ हे गायल होत. त्यावेळी हे गाणं 15 लाखांहून अधिक रुपयांना विकले गेले होते. त्यानंतरही हे गाणे रिलीज झालं नाही. (Famous actors kishore kumar birth anniversary ashok kumar brother acting singing career films songs unknown facts)

अधिक वाचा- 
सहाय्यक अभिनेता म्हणून अरबाज खानने केलेली करिअरला सुरुवात, भावाच्या साथीने गाठले यशाचे शिखर
“त्यांनी आमच्या कुटुंबात फूट पाडण्याचा..” सावत्र आई हेलनबद्दल अरबाज खानचा मोठा गौप्यस्फोट

हे देखील वाचा